वेस्टर्न कपड्यात विद्यार्थिनीच्या डान्सवरुन वाद, कट्टरपंथीय भडकले... सोशल मीडिआवर वाद

विद्यार्थिनीच्या डान्सला तीव्र विरोध, जगभरात Video ठरतोय चर्चेचा विषय

Updated: Oct 23, 2022, 02:31 PM IST
वेस्टर्न कपड्यात विद्यार्थिनीच्या डान्सवरुन वाद, कट्टरपंथीय भडकले... सोशल मीडिआवर वाद title=

Trending Video : सोशल मिडियावर (Social Media) एका विद्यार्थिनीचा (Student) डान्सचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असून यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कॉलेजच्या एका कार्यक्रमात ही मुलगी डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कट्टरपंथी चांगलेच संतापले असून व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पाकिस्तानमधल्या (Pakistan) एका महाविद्यालयातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय भनला आहे. पाकिस्तानमधल्या पेशावर (Peshawar) इथं एका खाजगी महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने स्टेजवर गाणं गात डान्स केला. मुलीने केलेलं हे कृत्य आक्षेपार्ह असल्याचं कट्टरपंथीयांचं म्हणणं आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थिनीने वेस्टर्न कपडे (Western Dress) घातले आहेत. स्टेजसमोर कॉलेजमधले अनेक विद्यार्थी तिचं गाणं आणि डान्सला दाद देताना दिसत आहेत. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खैबर मेडिकल युनिव्हर्सिटीने याची गंभीर दखल घेत खाजगी विद्यापीठाला नोटीस पाठवली आहे. स्टेजवर असे कपडे घालत अश्लील डान्स करणं आक्षेपार्ह असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलंय. तसंच याप्रकरणी तीन दिवसात उत्तरही मागण्यात आलं आहे. 

नोटीसीला उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या महाविद्यालयाची मान्यताही रद्द होऊ शकते.दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे. कट्टरपंथीयांनी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या विद्यार्थिनीच्या परफॉर्मन्सवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

एका युझरने म्हटलं, असे प्रकार कधीच खपवून घेतले जाणार नाहीत. तर एका युझरने म्हटलंय, हा प्रकार खूपच लाजीरवाणा आहे, इस्लाममध्ये याला जागा नाही. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात शाळेत अशा प्रकारच्या डान्सना कार्यक्रमात बंदी घालण्यात आली आहे.