तरुणीने शोधली आपली 77 भावंडं, वडिलांचं सत्य कळताच पाया खालची जमीन सरकली

Trending News : आपल्या खऱ्या वडिलांना शोधत असताना एका तरुणीला जेव्हा सत्य कळलं तेव्ही तिच्या पाय खालची जमीन सरकली. आपल्या 77 भाऊ-बहिणींना तिने शोधून काढलं. यापेक्षाही अधिक भावंडं असू शकतात अस वाटत असून त्यांचाही ती शोध घेत आहे.   

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 05:55 PM IST
तरुणीने शोधली आपली 77 भावंडं, वडिलांचं सत्य कळताच पाया खालची जमीन सरकली title=

Trending News : अनेक कुटुंबांमध्ये  अशी रहस्ये असतात जी अचानक उघड झाल्यावर नातेसंबंध आणि कौटुंबिक वातावरणात वादळ उठतं. नुकतंच एका तरुणालाही तिच्या कुटुंबाचं असं एक रहस्य कळले की तिचं मन अस्वस्थ झालं. अमेरिकेतील (America) ओहायोमधल्या क्लीव्हलँड इथं राहाणारी शीना हॉलंड-डोलन ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. पण वयाच्या विसाव्यावर्षी हे आपले खरे वडील नसल्याचं तिला कळलं. आई-वडिलांना मुल होत नसल्याने त्यांनी स्पर्म डोनरची (Sperm Donor) मदत घेतल्याची माहिती तिला मिळाली. याचा तिला मोठा धक्का बसला. 

खऱ्या पित्याच्या शोधात
सत्य समजल्यानंतर शीनाने आपल्या खऱ्या वडीलांचा शोध घेण्याचा ठरवलं. यासाठी तीने एका वेबसाईटची मदत घेतली. यात स्पर्म डोनरचा गोपनिय डेटा जमा करण्यात आला होता. त्यामुळे तिने या वेबसाईटमधल्या एका व्यक्तीला पैशांचं आमिष देत तीने आपल्या खऱ्या वडिलांचं नाव शोधून काढलं. पण जेव्हा तिला खऱ्या वडिलांचं सत्य कळलं तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या वडिलांना तबब्ल 77 मुलं (Sibiling) असल्याचं तिला कळलं. 77 पैकी शीना ही 47 वी मुलगी होती. तिचे वडील हे प्रोफेशनल स्पर्म डोनर होते. शीनाचे वडील हे पैसे कमवण्यासाठी कॉलेज जीवनापासूनच स्पर्म डोनर बनल्याची माहिती तिला मिळाली.

आपल्या 77 भावंडांचा शोध घेण्यासाठी शीनाने एक फेसबूक पेज तयार केलं. या माध्यमातून तिने जवळपास 77 भावंडांचा शोध लावला. या भावंडांमध्ये कोणी वयस्क तर कोणी अगदी लहान वयाचे आहेत. त्यांच्या आवडी-निवडीही भिन्न आहेत. पण आपल्या भावंडांना भेटून शीना आनंदी आहे. 

बायकोला मारण्यासाठी सुपारी
दरम्यान, अमेरिकेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी प्लान बनवला आणि विशेष म्हणजे हत्येची सुपारी देण्यासाठी त्याने खुलेआम जाहीरातबाजीही केली. एका उबेर टॅक्सीतून प्रवास करताना लियोनार्ड थूओ मविथिगा या व्यक्तीने चक्क उबेर चालकालाच आपल्या पत्नीची हत्या करायची असून तूझ्या ओळखीत कोणी किलर आहे का याची चौकशी केली. लियोनार्ड थूओ मविथिगाची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. त्यामुळे तिची हत्या करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. 

घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर उबेर चालकाने ही माहिती पोलिसांनी दिली.  पत्नीला इंजेक्शन देऊन आजारी करायचं आणि नंतर हळूहळू तिची हत्या करायची असा प्लान  लियोनार्ड थूओ मविथिगाने आखला होता.पण पोलिसांनी त्याआधीत त्याला अटक केली आणि तुरुंगाची हवा खायला लावली.