Skirt Wearing Girl Viral Video : आज आपण 2023 या वर्षांत पदार्पण केलं असताना स्त्री पुरुष (Equality of men and women) खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करताना दिसतं आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social media video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका तरुणीला या व्हिडिओमध्ये (Girl Viral Video) देण्यात येणारी वागणूक पाहून संताप अनावर होतो. तु्म्ही पाहू शकता तरुणीला जनावरासारखी वागणूक देण्यात येतं आहे. आपण कुठल्या जगात वावरत आहोत अशी शंका हा व्हिडिओ पाहून पडते.
या व्हिडिओ एक तरुणीमागे शेकडो तरुण गैरवर्तन (Girl Misbehaved Video) करताना दिसतं आहे. त्या तरुणीला एका व्यक्तीने तर लाथ मारतानाही दिसतं आहे. त्या तरुणीला अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करण्यात येतं आहे. त्या तरुणीची चूक फक्त एवढीच होती की ती स्कर्ट घालून आली होती.
एका बाइक रॅलीमध्ये (Bike rally Video) एक तरुणी आपल्या मित्रासोबत आली होती. या बाइक रॅलीसाठी ही तरुणी स्कर्ट (skirt) घालून आली होती. हे पाहून धार्मिक कट्टरवादी तरुणींचं अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी तरुणीसोबत अमानुष प्रकारे वागण्यास सुरुवात केली. शेकडो लोकांनी त्या तरुणीला धडा शिकवण्यासाठी असं कृत्य केल्याचं म्हटलं जातं आहे.
ही घटना इराकमध्ये (World News) घडली आहे. इराणमध्ये महिलांच्या कपड्याबद्दल कठोर नियम आहेत. इस्लामिक ड्रेस कोडनुसार या तरुणीने कपडे परिधान केले नव्हते. त्यामुळे उपस्थित लोकांचे भावना दुखावल्या गेल्या. हा राग एवढा अनावर झाला की, त्यांनी त्या तरुणीला लाथ मारली आणि शिवीगाळ करण्यास सुरु केली. इराकच्या (Iraq vidoe) कुर्दिस्तान भागात असलेल्या सुलेमानिया शहरातील हा धक्कादायक प्रकार आहे. 17 वर्षांच्या या तरुणीला समाजातील या गटातून क्रूर वर्तन सहन करावं लागलं. या भडकलेल्या जमावातून या तरुणीला जीव वाचवून निघणे देखील कठीण झालं होतं. (Trending Video mob misbehaves with a young woman and men beating woman because Wearing Skirt viral on Social media)
एल तेहरानी असं या पीडित तरुणीचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिचा एक साथीदार ए खानक याने तिला बाइकवर बसून या जमावातून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही मारहाण करण्यात आली. एवढचं नाही तर एका व्यक्ती त्या तरुणावर चाकूने हल्ला केला.
Terrifying moment hundreds of men swarm around lone girl, 17, and attack her for 'dressing immodestly and distracting riders' at a motorcycle event in #Iraq pic.twitter.com/1QLM98M4rM
— Patriot (@NamoTheBestPM) January 5, 2023
दरम्यान या प्रकरणात सुलेमानिया पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. शिवाय त्यांचाकडून चाकू आणि तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही धक्कादायक घटना घडली तेव्हा दुसरीकडे इराणमध्ये महिला हिजाबच्याविरोधात निदर्शने करत होती.