जाळ्यात सापडला दुतोंडी मासा, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

खरंच माश्याला दोन तोंड आहेत का?, तुम्ही पाहिलाय का असा मासा, पाहा VIDEO

Updated: Sep 22, 2022, 02:20 PM IST
 जाळ्यात सापडला दुतोंडी मासा, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकजण चक्रावले आहेत. या व्हिडिओत नेमकं असं काय आहे? ते जाणून घेऊयात.  

व्हिडिओत काय? 
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका माशाचा व्हिडिओ (fish video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेल्या माशाला दोन तोंड (Two Mouth Fish) असल्याचे दिसत आहे. माशाला दोन तोंड असल्याचे पाहून तो खुप विचित्र दिसत आहेत. हा दुतोंडी मासा पाहुन अनेकांना आश्चर्य़ाचा धक्का बसला आहे. या माशाला पाहून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कोणत्या प्रजातीचा मासा आहे?
व्हायरल होत असलेल्या दुतोंडी माशाचे (Two Mouth Fish) नाव कार्प फिश (Carp Fish) आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये माशाला दोन तोंड दिसत आहेत. या माशाचे दुसरे तोंड पूर्णपणे सामान्य दिसत आहे. हे पहिल्या तोंडाखाली लहान गुहासारखे दिसते. तसेच या माशाचे तोंडच नाही तर डोळेही विचित्र आहेत. या माशाला चार डोळे दिसतात जे खूप विचित्र आहे. माशाच्या डोळ्यात थोडासा निळसरपणा आहे, दोन्ही डोळ्यांवर धुके दिसत आहे.

शास्त्रज्ञही संभ्रमात 
दुतोंडी मासा (Carp Fish) पाहून अनेकांना विश्वास बसत नाही आहे. काही नेटकरी याला चेर्नोबिल दुर्घटनेचा रेडिएशनचा बळी म्हणत आहेत, तर कोणी दुसऱ्या तोंडाला माशाच्या शरीराची जखम सांगत आहेत. मात्र ही ही जखम होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या माशाला पाहून शास्त्रज्ञही संभ्रमात पडले आहेत. माशांना दोन तोंडे असण्याचे कारण शास्त्रज्ञांना स्पष्ट करता आलेले नाही. तपासाशिवाय काहीही बोलणे योग्य होणार नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच म्हणण काय?
अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. टिमोथी मुसो म्हणतात की, जर रेडिएशनमुळे उत्परिवर्तन होत असेल तर ते वाढणे शक्य नाही. त्यानुसार, जर  चेर्नोबिल रेडिएशन हे दुसऱ्या तोंडाचे कारण असेल तर माशांची वाढ आणि पुनरुत्पादनाची शक्यता कमी होते.

दरम्यान (Two Mouth Fish) दुतोंडी माशाचा (Carp Fish) हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. हा व्हिडिओ पाहुन अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नाहीये.