Turkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता

Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार?   

Updated: Feb 8, 2023, 10:46 AM IST
Turkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा   30 हजारांवर जाण्याची शक्यता   title=
छाया सौजन्य- रॉयटर्स/ Turkey earthquake updates death toll might rise to 30000 who shocking predictions latest Marathi news

Turkey earthquake latest updates : तुर्कीमध्ये आलेल्या महाभयंकर भूकंपानंतर आता परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. सोमवारपासून इथं आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू ओढावला आहे. किंबहुना शहरंच्या शहरं उध्वस्त झाली आहे. देशाचा बहुतांश भाग जमीनदोस्त झालेला असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भलतीच भीती व्यक्त करण्यात आली आहे. WHO नं केलेल्या दाव्यानुसार तुर्कीमध्ये भूकंपाच्या कचाट्यात सापडेल्यांपैकी आतापर्यंत 5 हजार मृत्यूंची अधिकृत नोंद झालेली असली तरीही हा आकडा तब्बल आठ पटींनी जास्त असू शकतो. म्हणजेच मृतांचा आकडा 30 हजारांच्याही पलीकडे जाऊ शकतो. 

तुर्कीमध्ये पाच शक्तीशाली भूकंपांची नोंद

तुर्कीमध्ये सोमवारी 7.8, 7.6 आणि 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपांची नोंद करण्यात आली. मंगळवारीसुद्धा इथं 5 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रता असणारे भूकंप आले. दरम्यानच्या काळात इथं बऱ्याच प्रमाणात धरणीकंप जाणवत होते अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तुर्कीसोबतच लेबनान, इस्राईल, सीरियामध्ये भूकंपाचे हादरे बसले.

हेसुद्धा वाचा : अबब! अवकाशातून दिसत होती इतकी भीषण आग; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

सध्याच्या घडीला समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार तुर्कीमध्ये मृतांचा आकडा आता 7800 च्याही पलीकडे पोहोचला आहे. 

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अतीप्रचंड भूकंपामुळं मोठं नुकसान झालं. ज्यामुळं अनेक मोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोलमडल्या. अद्यापही शेकडो नागरिक ढिगाऱ्यांखाली अडकले असून, काहींना अजूनही आपल्या माणसांचा थांगपत्ता लागलेला नाही. तुर्कीमध्ये आलेल्या या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. 

भारताकडूनही देण्यात आला मदतीचा हात  

तुर्कीला भूकंपाच्या हादऱ्यानं उध्वस्त केलेलं असतानाच भारताकडून तातडीनं मदतीचा हात पुढे करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून तुर्कीसाठी मदतीची घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीआरएफचं पहिलं पथक तुर्कीच्या दिशेनं रवाना झालं. भारतीय वायुदलाच्या विमानातून हे पथक मदतीसह तिथं पोहोचलं. या पथकामध्ये पुरुष आणि महिला स्वयंसेवकांसह डॉग स्क्वाड, प्रथमोपचार सामग्री आणि काही महत्त्वाच्या उपकरणांचाही समावेश आहे.