UAE Astronauts: अंतराळ मोहिमेवर असलेल्या वडिलांना चिमुकल्यांनी पृथ्वीवरील सगळ्यांत सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला? आपल्या मुलांच्या प्रश्नावर अंतराळवीराने दिलेले उत्तर तुम्हालाही भावूक करुन जाईल. संयुक्त अरब अमीरातमध्ये मोहम्मद बिन राशिद (MBR) अंतराळ संस्थेने अलीकडेच एक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गंत अंतराळवीर सुल्तान अल नेयादी यांना अंतराळात पाठवण्यात आले आहे. संस्थेने अल नेयादी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अल नेयादी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या मुलांसोबत संवाद साधत आहेत. दोघांच्या संवादाची एक छोटीशी क्लिप व्हायरल होत आहे.
युएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांचा गुरुवारी अंतराळातून जनतेला व्हिडिओ कॉल केला होता. या व्हिडिओ कॉल मनाला स्पर्श करणारा आहे. यात ते त्यांच्या दोन्ही मुलांसोबत बोलताना दिसत आहे. दोघेही त्यांना अंतराळातील रहस्यांबद्दल प्रश्न केले आहेत. डॉ. अल नेयादी यांना सहा मुलं आहेत. त्यातील दोघांनी अ कॉल फ्रोम स्पेस कार्यक्रमात भाग घेतला होता. यात त्यांनी अंतराळ संस्थेतील लोकांसोबत थेट बोलणे केले.
व्हायरल व्हिडिओत, नेयादीचा मुलगा अब्दुल्ला याने आपल्या वडिलांना एक प्रश्न केला होता. अंतराळातून पृथ्वीवर असलेली कोणती गोष्ट त्यांना सर्वाधिक आवडली? यावर नेयादी यांनी दिलेले उत्तर एकून सर्वच वातावरण भावूक झाले होते. पृथ्वीवरील असलेला तू ही अशी एक गोष्ट आहे. ज्यावर मी सर्वाधिक प्रेम करतो. पण जर तुला असे म्हणायचे असेल की मला स्पेसबद्दल सर्वात जास्त काय आवडते ते म्हणजे तुम्हाला माहिती आहेच, आम्ही येथे मायक्रोग्रॅविटी वातावरणात आहोत. तुम्हाला आवडतील अशा अनेक गोष्टी आम्ही येथे करू शकतो. आपण सर्व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्डाण करू शकतो, असं त्याने म्हटलं आहे.
ही पोस्ट 10 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यानंतर 10 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 100 पेक्षा जास्त लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.