युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत उत्तम डान्सर, पाहा व्हिडीओ

तुम्ही म्हणाल युक्रेन जळत होता आणि राष्ट्राध्यक्ष डान्स करत होता... पण पाहा हा व्हिडीओ कधीचा आहे?

Updated: Mar 1, 2022, 08:41 PM IST
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत उत्तम डान्सर, पाहा व्हिडीओ  title=

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 6 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अजून तरी यावर तोडगा निघाला नाही. युद्धसंघर्षा दरम्यान आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.

हा व्हिडीओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांचा आहे. रशियाला मोठ्या धाडसाने प्रत्युत्तर देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये वोलोडिमिर जेलेंस्की डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एकेकाळी डान्स रिअॅलिटी शोमध्ये पटकावलं बक्षीस
वोलोडिमिर जेलेंस्की यांचा हा व्हिडीओ 48 लाखहून अधिकवेळा युझर्सनी पाहिला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती होण्याआधी ते कॉमेडियन शो करायचे. मीडिया रिपोर्टनुसार वोलोडिमिर जेलेंस्की यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा 2006 चा असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ आताचा नाही. 2006 मध्ये हा व्हिडीओ काढण्यात आला होता. 
 
 'डांसिंग विद द स्टार्स' या रिअॅलिटी शोमध्ये डान्स करतानाचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. या शोमध्ये त्यांनी उत्तम डान्स करण्यासाठी बक्षीसही पटकावलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता पुन्हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.