उत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.

Updated: Nov 11, 2017, 12:45 PM IST
उत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास title=

नवी दिल्ली : अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.

दक्षिण कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवर आज हा सैन्य अभ्यास सुरु झाला. या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आशिया खंडाचा दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात ते अण्वस्त्र धोका यावर चर्चा करणार आहेत.

दक्षिण कोरियन सैन्याच्या मते, शनिवार ते मंगळवार दरम्यान या युद्ध अभ्यासात तीन अमेरिकन नौका - यूएसएस रोनाल्ड रीगन, यूएसएस थियोडोर रूझवेल्ट आणि यूएसएस निमिट्झ सहभागी झाले आहेत.