अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. 

shailesh musale Updated: Mar 27, 2018, 09:21 AM IST
अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या कंपन्यांमध्ये पाकिस्तानच्या ७ कंपन्यांचं नाव टाकलं आहे. या कंपन्या अणू उत्पानात असल्याचा आरोप आहे. अमेरिकेला या कंपन्यांवर संशय आहे की या कंपन्या अणू व्यवसायात सहभागी आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा एनएसजी समुहात सहभागी होण्याचा मार्ग देखील बंद झाला आहे.

पाकिस्तानला दणका

अमेरिकेच्या ब्यूरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्योरिटीने मागच्या आठवड्यात प्रकाशित फेडरल रजिस्टरमध्ये एकूण २३ कंपन्यांचा समावेश केला. पाकिस्तान शिवाय या यादीत सुडानच्या १५ कंपन्या आणि सिंगापूरची एक कंपनी आहे. या कंपन्या आता आंतरराष्ट्रीय व्यापार नाही करु शकणार. ब्यूरोने म्हटलं की या कंपन्या सुरक्षेमध्ये गंभीर समस्या तयार करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते घातक आहे. या कंपन्यांना आता निर्यातीसाठी अनेक नियमांची पालन करावं लागेल आणि पूतर्ता करावी लागेल.