नोकरी सोडताना कराल 10 वेळा विचार; Notice Period मध्ये ही कंपनी देतेय 10 टक्के पगार वाढ

 लोकांनी आमचे काम सोडावे असे आम्हाला वाटत नाही असेही कंपनीने म्हटलंय

Updated: Sep 16, 2022, 03:34 PM IST
नोकरी सोडताना कराल 10 वेळा विचार; Notice Period मध्ये ही कंपनी देतेय 10 टक्के पगार वाढ title=
एखाद्या कंपनीत काम करताना तुम्ही तुमचा राजीनामा (resignation) दिलात की तु्म्हाला नोटिस पिरिएडमध्ये (notice period) काम करावं लागतं. नोटिस पिरिएडमध्ये काम करणारे कर्मचारी (employee) हे अगदी निवांतपणे काम करतात असं अनेकदा म्हटलं जातं. पण नोटीसचा पिरिएड पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा कालावधी किती अस्वस्थ करणारा असतो याची चांगली जाणीव त्या व्यक्तीलाच असते.
 
पण कल्पना करा की तुम्हाला कळलं की नोटीस पिरिएडमध्ये (notice period) कंपनीने तुमचा पगार 10 टक्क्यांनी वाढवला आहे, तर हा नोटिस पिरिएड (notice period) तुमच्यासाठी किती सोपा आणि आनंदी असेल. असेच काहीसं अमेरिकेत (United States) घडलं आहे. अमेरिकेतील गोरिल्ला 76 (Gorilla 76) नावाच्या कंपनीने त्यांच्या नोटिस पिरियडमध्ये (notice period) काम करणाऱ्या लोकांच्या पगारात दहा टक्क्यांनी वाढ केली आहे.
 
काय आहे प्रकरण?
 
अमेरिकेत गोरिला 76 नावाची मार्केटिंग कंपनी आहे. जे एका दशकाहून अधिक काळ बिझनेस टू बिझनेस (B2B) कंपन्यांसोबत काम करत आहे. या कंपनीमध्ये, नोटिस पिरिएडमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पगारात 10 टक्के वाढ केली जाते (10 per cent salary increase). कंपनीचे संस्थापक जॉन फ्रँको (Jon Franko) यांनी लिंक्डइन ( LinkedIn) पोस्टवर या कंपनीच्या धोरणाबद्दल सांगितलं आहे.
 
"गोरिलामध्ये काम करणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍याने आम्हाला नवीन नोकरीच्या शोधात कंपनी सोडल्याची माहिती दिल्यास, आम्ही त्याच्या पगारात 10% वाढ करतो, जर तो पूर्णवेळ कर्मचारी असेल आणि किमान सहा आठवड्यांपासून कंपनीत असेल तर.  यामुळे त्याला गोरिल्लासोबत घालवलेल्या वेळेची आठवण करून देईल. आम्ही त्याला तीन महिन्यांत कंपनी सोडण्यास सांगतो," असे जॉन फ्रँको यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
"यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन मिळतं ज्यांना वाटते की ते अडकले आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी आहेत. हे आम्हाला पुढे जाण्यासाठी वेळ देखील देते. लोकांनी आमचे काम सोडावे असे आम्हाला वाटत नाही. पण सगळे आपल्यासोबत निवृत्त होतील, असा विचार करणेही मूर्खपणाचे ठरेल. ही पद्धत सोपी करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही जॉन फ्रँको म्हणाले.
111
 
नोटिस पिरिएड म्हणजे काय?
 
एखाद्या कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍याने कंपनीकडे राजीनामा दिल्यावर काही काळ त्या कंपनीत काम करावे लागते. ही वेळ कंपनीच्या धोरणावर अवलंबून असते. प्रत्येक कंपनीच्या नोटिस पिरिएडचा कालावधी वेगळा असतो.