सोल : उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन अण्वस्त्र सज्ज देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाचे रूप धारण करत आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी अमेरिकेसकड जगभरातील अनेक देशांनी कुटनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, या कुटनीतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य फार महत्त्वाचे आहे. चीनच्या दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी चीनी राष्ट्रपती शी जिनपींग यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्र सज्जतेला आवर घालण्यासाठी चीनची मदत मोलाची आहे. त्यासाठी शी जिनपींग हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पेइचिंग दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले की, उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चीन हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. आम्हाला आशा आहे की, रशीयासुद्धा अशाच प्रकारे सहकार्य करेन, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाबद्दलच्या राजकीय आणि कुटनैतीक पातळीवरील भूमिकेसाठी चीनची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते. चीनची ही भूमिका तेव्हा पासून महत्त्वपूर्ण आहे जेव्हा, चीने लाखो 'पिपल्स वॉलेंटीअर' कोरियाई युद्धात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र सेनेचे्या लाढाईत मारले गेले होते. दरम्यान अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर अमेरिका उत्तर कोरियाला जगात एकटे पाडू इच्छिते. त्यासाठी अमेरिक चीनचे सहकार्य अपेक्षीत करते.