Video : तरुणीने स्वत:साठी खोदला खड्डा, धावत्या बाइकवरुन दुसऱ्या बाइकला मारली लाथ आणि मग...

Trending Video :  अशाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत घडला आणि तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल कर्माची शिक्षा (Instant Karma) इथेच भोगावी लागते. 

Updated: Nov 8, 2022, 09:25 AM IST
Video : तरुणीने स्वत:साठी खोदला खड्डा, धावत्या बाइकवरुन दुसऱ्या बाइकला मारली लाथ आणि मग... title=
Video girls Trying to kick another rider viral on Social media nmp

Girl Funny Video : राग कधीही चांगला नसतो. तो कायम आपल्याला संकटात टाकतो. मराठीमध्ये अशी म्हण आहे की, दुसऱ्यांसाठी खड्डे खोदल्यास स्वत:च आपण त्यात पडतो. अशाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत घडला आणि तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल कर्माची शिक्षा (Instant Karma) इथेच भोगावी लागते. हा व्हिडीओ पाहून आपण शिकण्यासारखं पण आहे आणि या व्हिडीओमधील तरुणीचा मुर्खपणा पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.  

धावत्या रस्त्यावर बाइकवर तरुणी गेली असं काही करायला...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर दोन बाइक जात आहेत. धावत्या रस्त्यावर बाइकवर तरुणीने जे काही करायला गेली त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका बाइकवर तरुणी आणि तरुण जातं आहेत. तर दुसऱ्या बाइकवरुन एक महिला जातं आहे. तरुणाच्या मागे बसलेली तरुणीने अचानक बाजूच्या महिला बाइकला लाथ मारते आणि काय...अहो याच तरुणीचा तोल गेला आणि तिचच खाली पडली ना...ती तरुणी खाली पडली हे तरुणाला जरा पुढे गेल्यावर कळलं. तो थांबला पण त्या बाइकला ती लाथ मारायला गेली ती तरुणी बाइक घेऊन निघून गेली. (Video  girls Trying to kick another rider viral on Social media nmp)

 इथेच भोगावी लागते कर्माची शिक्षा

बघितलं, म्हणून म्हणतात इथेच भोगावी लागते कर्माची शिक्षा. या तरुणीने दुसऱ्या तरुणीला बाइकवरुन पाडण्याचा प्रयत्न केला पण तिच रस्त्यावर खाली पडली. इंटनेटवर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतोय. या व्हिडीओमधील मुलीची खूप खिल्ली उडवली जाते आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'यालाच झटपट कर्म म्हणतात.' बर्‍याच लोकांना प्रसिद्ध व्हिडिओ गेम 'रोडरश' आठवला, कारण गेममध्ये रेसिंग करताना अशीच परिस्थिती समोर येते. आणखी एका यूजरने लिहिले की, 'मुलीच्या बॅगने तिला गंभीर दुखापतीपासून वाचवले.'