Viral Video : जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी जेव्हा जागा होतो...हो अमेरिकेतील (America) हवाई बेटांवर असलेला जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी (Volcano Video) मौना लाऊआचा (Mauna Loa ) 40 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11.30 वाजता मौना लाऊआचा स्फोट झाला. या स्फोटाचे भयान वास्तव सांगणारा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सगळीकडे राख आणि वायूचे साम्राज्य पसरलं आहे. USGS च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखीच्या लावामध्ये सर्वाधिक सल्फर डायऑक्साइड (Sulfur dioxide) आहे. याशिवाय हा लावा एका आठवड्यात हाहाकार माजवू शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या व्हिडिओमधून ज्वालामुखीचा उद्रेक पाहून तुम्हाला धोक्याचा अंदाज आला असेलच. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना मोठ्या प्रमाणात धूर आणि राखेचा सामना करावा लागू शकतो. हवाईच्या ईशान्येकडील हा ज्वालामुखी विषारी वायू पसरवत आहे आणि वाढतच आहे.(video Largest Volcano Erupt Mauna Loa looks from space viral on social media)
The world’s largest active volcano, #MaunaLoa on Hawaii’s Big Island, has erupted for the first time since 1984.
The lava flow is contained within the summit, but the @USGS has warned the 200,000 people who lived on the island that the situation could change rapidly. pic.twitter.com/g2AAmAYUVa
— NoComment (@nocomment) November 29, 2022
ज्वालामुखीमध्ये आणखी किमान डझनभर उद्रेक होऊ शकतात. त्याच वेळी, त्याच्या शेजारी स्थित किलोवाया देखील डिसेंबर 2021 पासून धोकादायक पातळीवर सक्रिय आहे. याचा कधीही स्फोट होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.
Here is today's Sentinel 2 image. Lava is visible flowing northeastward. I enhanced the NIR and SWIR bands over top and added lat/lon to show the flow direction and location. Image time is 21:00 UTC. pic.twitter.com/l7GXtQOeCV
— Timothy E. Wright (@wrighthydromet) November 29, 2022
हवाईमध्ये जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. इथं असणाऱ्या आणि सध्या उद्रेक झालेल्या मौना लोआ या ज्वालामुखीची उंची 13600 फूट इतकी आहे. 1984 मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ज्वालामुखी स्पेनमध्ये आहे.