India - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?

India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

Updated: Nov 30, 2022, 11:28 AM IST
India - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?  title=
China might attack india in 2023 to prove its streangth know the reason

India and China War in 2023 : तिथे रशिया आणि युक्रेन ( Russia Ukraine War ) या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत. 2022 हे वर्ष बऱ्याच संकटांचं असल्याची बाब सर्वांनीच पाहिली आणि अनुभवली. जगभरातील विविध देश आपआपल्या प्रतिस्पर्धी देशांशी असणारं शत्रुत्व विकोपाला नेण्याचीच चर्चा करताना दिसले. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या वर्षातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. कारण, 2023 हे वर्ष भारत आणि चीन (India vs China) या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांच्या दृष्टीनं अतीव महत्त्वपूर्ण वर्ष असणार आहे. असे संकेत आहेत की, चीनकडून आपलं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जात युद्धाची हाक दिली जाऊ शकते. (China might attack india in 2023 to prove its streangth know the reason)

भारत आणि चीन यांच्यात युद्ध का होणार? (India China war)

यंदाच्या वर्षी चीन आणि अमेरिकेमध्ये सातत्यानं वादाची ठिणगी पडताना दिसली. भारत आणि चीन संदर्बातही असंच चित्र येत्या काळात पाहायला मिळू शकतं. यासाठी तज्ज्ञांच्या मते नेमकी काय कारणं आहेत ते एकदा पाहाच. 

- दोन्ही देशांमध्ये सातत्यानं वाढणारा तणाव 
भारत आणि चीन हे दोन्ही देश 1962 मध्ये युद्धाच्या कारणानं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर सियाचीन आणि सदरील परिसराशी निगडीत असणाऱ्या सीमा वादावरून दोन्ही देशांमध्ये सतत खटके उडताना दिसले. सीमा भागात या दोन्ही देशांमध्ये असणारा वाद विकोपास तेव्हा गेला, ज्यावेळी गलवान खोऱ्यामध्ये (Galwan valley) हिंसा घडली. 

हेसुद्धा वाचा : Iran Hijab Protest: इराण मध्ये मृत्यू तांडव; हिजाबविरोधी निदर्शनांमुळे आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

- चीनसाठी भारत एक मोठं आव्हान 
आशिया खंडात (Asia) सध्याच्या घडीला भारत चीनपुढे असणारं एक मोठं आव्हान आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगावं तर जपान सध्या बराच आघाडीवर आहे. असं असलं तरीही भारत ज्या वेगानं पुढे जात आहे ते पाहता जपानलाही तो मागे टाकू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारताला अडवणं हाच चीनचा प्राथमिक हेतू असू शकतो. 

- आशिया खंडात वर्चस्व सिद्ध करण्याचा चीनचा मनसुबा 
अभ्यासकांच्या मते युद्धाच्या मार्गानं चीन भारतावर मात करून आपलं आशिया खंडातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा मार्ग अवलंबात आणू शकतो. अमेरिकेचे भारताशी असणारे मित्रत्वाचे संबंध पाहता हा देश युद्धात भारताची मदत करेल अशीच अनेकांची अपेक्षा आहे. पण, प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसणार नाही. ज्यामुळं 2023 या वर्षात भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये घडणाऱ्या लहानमोठ्या घडामोडीवर संपूर्ण जगाची नजर असणार आहे.