नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकवण्यात आल्याची घटना घडली आहे.
लाहौरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी नवाज शरीफ पोहोचले होते त्यावेळी ही घटना घडली आहे.
आरोपी तरुण हा जामिया नीमियाचा माजी विद्यार्थी असून तहरिक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह (TLYR)चा सदस्य आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका शाळेत आयोजित कार्यक्रमासाठी भाषण देण्यासाठी नवाज शरीफ पोहोचले होते त्या दरम्यान ही घटना घडली.
'जिओ टीव्ही' ने दिलेल्या वृत्तानुसार, नवाज शरीफ भाषण देण्यासाठी मंचावर पोहोचले त्याच दरम्यान उपस्थित प्रेक्षकांमधील एकाने बूट भिरकावला. नवाज शरीफ यांनी या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न केला मात्र, बूट त्यांच्या छातीवर लागला.
Video Of Shoe Thrown On Nawaz Sharif.#NSJoinsShoeClub pic.twitter.com/Hdgp8N9xVV
— SYED SHAHMEER ALI (@ShahmeerAliPTI) March 11, 2018
बूट भिरकावल्यानंतर आरोपी तरुणाने मंचावर जात घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी आणि नागरिकांनी आरोपीला पकडलं. त्यानंतर नवाज शरीफ यांनी उपस्थितांना संबोधित केलं.