Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं

Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो. 

Updated: Dec 7, 2022, 03:04 PM IST
Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं title=
video Window grill may harm your child take these precautions viral on social media nmp

Trending Video : आज कुठल्याही शहरात गेलो की आपल्याला गगनचुंबी इमारती (buildings) दिसून येतात. या गगनचुंबी इमारतीतील आलिशान घरांमध्ये खिडकी (Window in houses) ही काय त्यांची आकर्षणाची बाजू...या खिडकीची ग्रीलमध्ये (Window grill) आपण अनेक वेळा झाड्यांचा कुंड्या, सामान अगदी कधी कधी लहान मुलांना खेळताना पाहतो. जर तुमच्या लहान मुलांना ग्रीलजवळ, खिडकीत जाऊन खेळायची सवय असेल तर सावधान...कारण चिमुरड्याचा एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video ) समोर आला आहे. 

धक्कादायक व्हिडिओ 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुरडा ग्रीलमधून खाली लटकताना दिसतोय. अडीच तीन वर्षांचा असेल हा चिमुरडा.... पण खिडकीत खेळताना तो खाली पडला...मात्र वेळीच त्यानं ग्रीलच्या गजांना पकडल्यामुळे तो खाली पडण्यापासून बचावला. मात्र त्याला वाचवण्याचा खरा थरार इथून पुढे सुरू झाला...

थरारक दृश्यं

या चिमुरड्याच्या घरात कुणी नसावं किंवा चुकून दरवाजा लॉक झाला असावा त्यामुळे खिडकीतून या मुलाला वाचवायला कुणी येताना दिसत नाहीय. त्यामुळे खालच्या मजल्यावरच्या खिडकीतून या मुलाला वाचवण्यासाठी ह्रदयाचे ठोके चुकवणारा थरार सुरूय. एक माणूस खालच्या मजल्यावरच्या गच्चीतून या मुलाला खालून पकडण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचदरम्यान या लहानग्याची मान ग्रीलच्या खालच्या गजात अडकली. त्यामुळे त्याला वाचवण्याची घालमेल आणखीनच वाढली. (video Window grill may harm your child take these precautions viral on social media)

खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं

तुम्ही पाहू शकता या मुलाला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहे. त्याच्या मानेला इजा होऊ नये, त्याला फास बसू नये म्हणून एकावर एक स्टूल ठेवून लहानग्याला खालून आधार द्यायचा प्रयत्न होतोय. पण मुलाचा तोल जातोय...तो स्टुलावर उभा राहू शकत नाहीये...त्याचा पाय घसरतोय. आता या मुलाचं काय होणार असं प्रश्न पडतोच तेवढ्यात एक माणूस देवाच्या रुपात घरातल्या खिडकीत येतो आणि त्या मुलाची शिताफीनं ग्रीलच्या गजांमधून मुलाची मान काढतो आणि त्याचा जीव वाचवतो

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

आणि हे पाहणाऱ्या सर्वांचाच जीव भांड्यात पडतो. हा व्हिडिओ भारतातला नाही पण असा प्रकार तुमच्या लहानग्यांसोबतही घडू शकतो. त्यामुळे सावधान...तुमच्या मुलांना एकटं खेळायला सोडू नका.. असा खेळ करणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं.