HAPPY NEW YEAR 2019 PHOTO : बाप्पाचरणी नतमस्तक होत स्वागत नव्या वर्षाचं...

HAPPY NEW YEAR 2019 

Updated: Jan 1, 2019, 07:21 AM IST
HAPPY NEW YEAR 2019 PHOTO : बाप्पाचरणी नतमस्तक होत स्वागत नव्या वर्षाचं...

मुंबई : HAPPY NEW YEAR 2019 
घड्याळाचे काटे मध्यरात्री बाराच्या आकड्यावर एकत्र आले आणि संपूर्ण जगानेच नव्या वर्षाचं अर्थात २०१९ चं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. प्रत्येकानेच अनोख्या अंदाजात या नव्या वर्षाचं स्वागत केलं आणि पाहता पाहता सोशल मीडियापासून ते गल्लीबोळापर्यंत अनेकांनी जणू काही कोण्या नव्या आणि हव्याहव्याशा पाहुण्याचं स्वागत करावं अगदी तसंच या नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. 

मुंबई आणि शिर्डीमध्येही ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सिद्धीविनायक येथेही भाविकांची तोबा गर्दी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी, पहाटेपासूनच पाहायला मिळाली. पश्चिम बंगाल येथे असणाऱ्य़ा हावडा ब्रीज येथेही आकर्षक रोषणाई करत नव्या वर्षाचं स्वागत केलं. 

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात जवानही मागे राहिले नाहीत. छत्तीसगढ येथील सीआरपीएफच्या जवानांनी गाण्यांवर ठेका धरत नवीन वर्षाचं स्वागत केलं. सोशल मीडियावर या उत्साहाची अनेक क्षणचित्रे सध्या अनेकांच्याच डोळ्यांचं पारणं फेडत आहेत.

लंडन, रशिया, सिडनी, हाँग काँग आणि जगातील सर्वच ठिकाणी, प्रत्येक कानाकोपऱ्यात आकर्षक रोषणाई आणि फटाके वाजवत नववर्षाचं स्वागत केलं. नवे संकल्प, नव्या आशा, नवी संधी आणि एकंदरच उत्स्फूर्त वातावरण या साऱ्या वातावरणात प्रत्येकजण २०१९ या वर्षाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.