लंडन : भारतातून लंडनला फरार झालेला वादग्रस्त उद्योगपती विजय माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी लंडनच्या वेबमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. माल्ल्या यांचा पुत्र सिद्धार्थ मल्ल्या हा देखील यावेळी कोर्टात उपस्थित होता.
आपण कोणत्याही कोर्टाचा अवमान करून पळून आलेलो नाही, असं सांगत मल्ल्या यांनी आपणावरील सर्व आरोप यावेळी फेटाळून लावले. ओवल क्रिकेट मैदानावर भारतीय प्रेक्षकांनी आपणावर चोर अशी शेरेबाजी केल्याचाही त्यांनी यावेळी इन्कार केला.
#WATCH I deny all allegations, I have enough evidence to prove my case in court,says Vijay Mallya on arrival in London court pic.twitter.com/n5U0sNHIhY
— ANI (@ANI_news) June 13, 2017
#WATCH Keep dreaming about the billion pounds, provided you have facts to justify your questions: Vijay Mallya after court hearing in London pic.twitter.com/KUyHj12C0k
— ANI (@ANI_news) June 13, 2017