विजय माल्ल्याच्या लंडनच्या घरात सोन्याचं टॉयलेट?

भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांना चुना लावून पळालेल्या विजय माल्ल्याबाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

Updated: Aug 12, 2018, 07:19 PM IST
विजय माल्ल्याच्या लंडनच्या घरात सोन्याचं टॉयलेट?

मुंबई : भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांना चुना लावून पळालेल्या विजय माल्ल्याबाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. विजय माल्ल्याच्या लंडनमधल्या घरात सोन्याचं टॉयलेट आहे, असं वक्तव्य लेखक जेम्स क्रॅबट्री यांनी केलं आहे. इकोनॉमिक टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे. जेम्स क्रॅबट्री हे ली कुआन यू स्कूलमध्ये प्राध्यापकही आहेत. मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात क्रॅबट्री यांनी माल्ल्याच्या लंडनमधल्या घराबद्दल माहिती दिली.

लंडनच्या रिजेंट्स पार्कमध्ये विजय माल्ल्याचं घर आहे. माल्ल्याच्या घरी मी गेलो होतो. तेव्हा मोनॅको ग्रॅण्ड प्रिक्सला हजेरी लावता न आल्यामुळे माल्ल्या नाराज होता असं क्रॅबट्री म्हणाले. माल्ल्याचं लंडनमधलं घर एखाद्या महालासारखंच आहे.

भारतातून पळून जायच्या आधी विजय माल्ल्यानं फॉर्म्युला वन, क्रिकेट आणि फूटबॉलच्या टीम विकत घेतल्या होत्या. महात्मा गांधींचा चष्मा आणि टीपू सुलतानची तलवारही माल्ल्यानं लिलावामध्ये विकत घेतली होती.