'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन

धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.  

Updated: Nov 16, 2022, 11:36 PM IST
'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन title=

Cigarette is Injurious to Health : धुम्रपान करणं आरोग्यासाठी घातक असतं. पण अनेकवेळा आव्हान करुनही काहीजणांवर याचा परिणाम दिसत नाही. चीनमध्ये मॅरेथॉनदरम्यान (Marathon) धुम्रपान (Smoking) करत मॅरोथॉन पूर्ण करणाऱ्या एका चीनी धावपटूची (Chinese Runner) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा आहे. त्याच्या या कृत्यावर मोठ्याप्रमाणावर टीकाही केली जात आहे. 

चिनी सोशल मीडियावर धुम्रपान करणाऱ्या या धावपटूचे फोटो प्रसिद्धीच्या झोतात आहेत. काही जणांनी त्याच्या श्वसन शक्तीची (Respiratory Toughness) तारीफ केली आहे. तर काही जणांनी असं करणं त्याच्या आणि इतर धावपटूंच्याही आरोग्यसाठी (Health) घातक असल्याचं म्हटलं आहे. 

या धावपटू 50 वर्षांचा असून चीनमध्ये तो अंकल चेन (Ancle Chain) या नावाने लोकप्रिय आहे. ने जियांडे (Jiande) ही चीनमधली मॅरेथॉन स्पर्धा असून ती 26.2 किलोमीटरची असते. अंकल चेनने या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यांनी 26.2 किमीची ही मॅरेथॉन पूर्ण केली. धावताना सातत्याने धुम्रपान करत त्यांनी साडेतीन तासात ही मॅरेथॉन पूर्ण केली.

चिनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार अंकल चेनने ही मॅरेथॉन 3 तास 8 मिनिटं आणि 45 सेकंदात पूर्ण केली. तब्बल पंधराशे धावपटूंनी यात भाग घेतला होता. अंकल चेन यांनी 574 व्या क्रमांक पटकावला.

सोशल मीडियावर कौतुक आणि टीका
सोशल मीडियावर अंकल चेन यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अंकल चेनच्या कृतीचं काही युजर्सने कौतुक केलं आहे. धावत धुम्रपान करणं हे एक आव्हान आहे, त्यांची श्वसन शक्ती खरोखरच उत्तम आहे असं काही जणांनी म्हटलं आहे. तर काही जणांनी अंकल चेनव टीका केली आहे. धावत धुम्रपान केल्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी हे घातकच आहे, पण इतर स्पर्धकांच्या आरोग्यासाठीही ते हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. अंकल चेन एक वाईट उदाहरण जगासमोर ठेवत असल्याची टीकाही त्यांच्यावर होतेय.

अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग
अंकल चेन यांची ही पहिली मॅरेथॉन नाही. याआधी त्यांनी 2018 मध्ये ग्वांग्झावू मॅरेथॉन 3 तास 36 मिनिटात पूर्ण केली होती. त्यानंतर 2019 मध्ये जियामेन मॅरेथॉन 3 तास 32 मिनिटात पूर्ण केली होती.