कधी उलटे पंख आणि सरळ मान असलेला पक्षी आकाशात उडताना पाहिलाय का? हा नक्की कोणता पक्षी आहे?

तुम्ही आकाशात उडणारे अनेक पक्षी पाहिले असतील, जे त्यांचे पंख खोलून आनंदाने मनसोक्त हवेत उडत असतात.

Updated: Aug 3, 2021, 04:02 PM IST
कधी उलटे पंख आणि सरळ मान असलेला पक्षी आकाशात उडताना पाहिलाय का? हा नक्की कोणता पक्षी आहे? title=

मुंबई : तुम्ही आकाशात उडणारे अनेक पक्षी पाहिले असतील, जे त्यांचे पंख खोलून आनंदाने मनसोक्त हवेत उडत असतात. तुम्ही पक्षी आकाशात उडत असताना त्यांचे निरीक्षण केलेच असणार, पक्षी त्यांचे पंख लांब करुन सरळ मानेने उडत असतात. परंतु तुम्ही कधी उलट्या पंखांनी उडणाऱ्या पक्षाला पाहिले आहे का? आणि असा पक्षी तुम्हाला पाहायला मिळाला तर? तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. परंतु हो हे खरे आहे.

उलटे पंख घेऊन उडणारा हा पक्षी एकप्रकाचा हंसा सारखा आहे. परंतु त्याला गुज (goose)असे म्हणतात. हंसाला लांब उड्डाणांसाठी ओळखले जातात आणि बरेच लोकं त्यांना बदक समजतात, परंतु प्रत्यक्षात ते बदक नाहीत. परंतु ते एक प्रकारचे स्थलांतरित पक्षी आहेत.

पण उलटे उडणारे हे हंस इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याचे असे उडणारे फोटो पाहून तुमचे मन चक्रावून जाईल आणि तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे उलटे बघायला सुरुवात कराल. कॅमेऱ्यात टिपलेले हे दृश्य दुर्मिळ आहे. व्हिन्सेंट कॉर्नेलिसन (Vincent Cornelissen) असे हे छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकाराचे नाव आहे.

व्हिन्सेंटने सांगितले की, तो एका तलावाजवळ आरामात बसून झाडाकडे पाहत होता, तेव्हा त्याने या पक्षाला पाहिले, जो नीट उडू शकत नव्हता.

त्याने लगेच कॅमेरा बाहेर काढला आणि फोटो काढायला सुरुवात केली. व्हिन्सेंटला आढळले की, हा पक्षी हवेत उलटा उडत होता. पण त्याची मान त्याने सामान्य स्थितीपासून 180 अंश फिरवली होती. म्हणजे शरीर उलटे होते पण त्याची मान योग्य जागी नव्हती.

हे फोटो पाहिल्यानंतर, काही वन्यजीव तज्ञांनी सांगितले की, कदाचित हे हंस मजा करण्याच्या मूडमध्ये असेल किंवा ते काही नवीन युक्ती शिकत असेल. तर बहुतेक लोक चित्र पाहिल्यानंतर म्हणतात की, हे फोटोशॉप केलेले फोटो असू शकतात. परंतु आता ज्यांच्या त्यांच्या विश्वास ठेवण्यावर आहे.