Raj Thackeray On D Gukesh : भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश (D Gukesh) याने गुरुवारी वर्ल्ड चेस चॅम्पिअनशिपचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंदनंतर अशी कामगिरी करणारा हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पिअनशिपच्या (World Chess Championship 2024) अंतिम सामन्यात डी गुकेशने चीनचा चॅम्पियन खेळाडू डिंग लिरेनला चेकमेट दिला. डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली.
डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट दिला. डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने पराभव केला. डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता. यापूर्वी 2012 मध्ये भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.
डी गुकेशच्या या यशानंतर सर्व स्थरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डी गुकेशचे अभिनंदन करून एक खास पोस्ट केली. यात त्यांनी म्हटले की, 'भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा'.
भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांच pic.twitter.com/s5s4Mmj6pb
— Raj Thackeray (RajThackeray) December 12, 2024
वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या डी गुकेशचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे एका तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी डी गुकेश तो बुद्धिबळ खेळायला शिकला. डी गुकेशने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्यानंतर त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावलं होतं. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती.