मुंबई : बऱ्याचदा असं आपल्या सोबत घडतं की, आपल्याला पहिल्याच नजरेत एखादी गोष्ट वेगळी दिसते आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे निरखून पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी दिसू लागतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला पाहून तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन होईल. ऑप्टिकल इल्युजन असलेल फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. अशाच आणखी एका फोटोने लोकांना विचारात पाडले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पेंटिंगमध्ये ऑक्टाव्हियो ओकॅम्पो यांनी तयार केलेल्या दोन प्रतिमा आहेत. त्याचे शीर्षक 'फॉरएव्हर ऑल्वेज' आहे.
हा फोटो पाहिल्यावर काही लोकांना यामध्ये दोन वृद्ध जोडपी एकमेकांना पाहात आहेत असं दिसत आहे. तर कोणाला यामध्ये दोन तरुण वाद्य वाजवताना दिसत आहे आणि तेथे एक महिला देखील उपस्थीत आहे.
हा फोटो लोकांना कन्फ्युज करणारा आहे. आता तुम्ही या फोटोकडे कसे पाहाता यावर तुमचा दृष्टीकोन अवलंबून आहे.
तसेच तुम्हाला या फोटोमध्ये पहिलं काय दिसलं? यावरुन तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे? आणि तुमचे व्यक्तीमत्व काय आहे, हे देखील सांगण्यात आले आहे.
यामध्ये असे म्हटले गेले आहे की, ज्यांनी वृद्ध जोडप्याला प्रथम पाहिले ते संपूर्ण जीवन जगले आहेत आणि ते त्यांच्या आयुष्यातील शांततेचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे, ज्या लोकांना त्यामधील तरुण आणि तरुणी दिसतात, त्यावरुन असे सांगण्यात येते की, अशी लोकं भविष्याला तोंड देण्याबद्दल आत्मविश्वास बाळगतात.