चहा आहे की हिरा! 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? गंभीर आजारांवर महागडा चहा गुणकारी?

रस्त्यावर एका चहा कटींगची किंमत पाच ते दहा रुपये इतकी असते. महागड्या ब्रँडची चहा पिणारे शौकिन काही हजार रुपये किंमतीची चहा पावडर विकत घेतात. पण एका चहा ब्रँडची किंमत कोट्यवधीत असेल असं जर तुम्हा कोणी सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.

Updated: Mar 27, 2023, 09:41 PM IST
चहा आहे की हिरा! 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? गंभीर आजारांवर महागडा चहा गुणकारी? title=

Viral News : अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाच्या (Tea) घोटाने होते. बाजारात विविध प्रकारचे, विविध किंमतीचे चहाचे ब्रँड उपलब्ध आहेत. या ब्रँडच्या किंमतीही चांगल्याच महागड्या (Expensive) असतात. पण जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत कोट्यवधी रुपये (World Most Expenisve Tea) आहे असं जर तुम्हा सांगतिलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. एका हिऱ्याच्या किंमतीएवढी चहाची किंमत आहे. ही चहा पावडर तब्बल 9 कोटी रुपये किलो दराने मिळते.

ही चहा पावडर साधारण नाहीये, तर या चहामुळे गंभीर आजार बरे होतात असा दावा करण्यात आलाय. पण, ही चहा पावडर खरंच एवढी महाग आहे का? गंभीर आजार बरे होतात? या चहात असं काय आहे की एवढी महागडी आहे? याची पोलखोल करण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला या चहासंदर्भात अधिक माहिती मिळाली.

व्हायरल पोलखोल
या महागड्या चहा पावडरचं नाव डा-होंग पाओ टी (Da-Hong Pao Tea)आहे. चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये इतकी आहे. 

चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे असल्याने दुर्मिळ झालीय. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते. डा-होंग पाओ टीची पाने अतिशय कमी असतात. चहा आरोग्यदायी असून, गंभीर आजारांवर परिणामकारक ठरतात असं म्हटलंय. त्यामुळे या चहाची किंमत कोट्यवधीत असली तरी अनेक जण या महागड्या चहाचा आस्वाद घेतात. 

चीनमध्येच आणखी एक महागडा ब्रँड
चीनमधील चहाचा आणखी एक ब्रँड जगप्रसिद्ध आहे. असं बोललं जातं की पांडाच्या शेणापासून जे खत तयार होते, ते खत चहाच्या मळ्यात वापरण्यात येते. या मळ्यात तयार होणाऱ्या एक किलो चहाची किंमत आहे 57 लाख रुपये इतकी आहे.

गातील तिसरा महागडा चहा सिंगापूरचा आहे. याचं पान सोनेरी रंगाचे असतं. वर्षांतून एकदाच या दुर्मीळ चहाचं पीक घेतलं जातं. या सोनेरी चहासाठी प्रतिकिलो खर्च आहे 6 लाख रुपये, याशिवाय आपल्या भारतात तयार होणारा सिल्व्हर टिप्स इम्पेरियल टी या ब्रँडचा हा चहा जगातील चौथा सर्वात महागडा चहा आहे. या चहाची पाने केवळ पौर्णिमेच्या रात्रीच तोडण्यात येतात. दार्जिलिंगच्या मळ्यात याचे उत्पादन घेण्यात येतं. एक किलो चहासाठी दीड लाख रुपये मोजावे लागतात.