Fact Check | चमत्कारिक किडा बनवेल तुम्हाला रातोरात करोडपती?

एक किडा आहे जो आपल्या घरात ठेवल्यास पैसेच पैसे येतात. या किड्याला करोडो रुपयांचा भाव असून, अनोखी शक्तीची प्राप्ती होते असा दावा करण्यात आलाय.

Updated: May 2, 2022, 10:19 PM IST
Fact Check | चमत्कारिक किडा बनवेल तुम्हाला रातोरात करोडपती?

मुंबई : एक किडा आहे जो आपल्या घरात ठेवल्यास पैसेच पैसे येतात. या किड्याला करोडो रुपयांचा भाव असून, अनोखी शक्तीची प्राप्ती होते असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच एका किड्यामुळे चमत्कार घडतो का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (viral polkhol fact check about beetle stag beetle)

हा दावा करणारा मेसेज आणि या किड्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. एवढा छोटा किडा कसा काय करोडपती बनवू शकतो? या किड्यामध्ये असं चमत्कार घडवण्यासारखं काय आहे.? आणि खरंच अशा किड्याने करोडपती होता येतं काम? हेच प्रश्न सगळ्यांना पडलेयत.

व्हायरल मेसेज पाहून काहींनी हा किडा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख हे एक्सपर्टना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि या दाव्याबाबत जाणून घेतलं.

व्हायरल मेसेजमधील दावा

या किड्याची किंमत 1 कोटी इतकी आहे. हा किडा घरात ठेवाल तर एका रात्रीत करोडपती व्हाल. कोट्यवधी मोजूनही किडा मिळेना. तसेच किडा घरात ठेवल्याने अनोख्या शक्तीची प्राप्ती होते, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. 

पडताळणीत काय पोलखोल झाली?

स्टॅग बिटल हा कीटक भारतात आढळत नाही. दुर्मिळ किडा असून यामुळे चमत्कार होतो हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं. किड्यापासून नेकलस, पेंडल, रिंग बनवल्या जातात.  किडा पर्यावरण पूरक असून औषधंही बनवली जातात. 

पण, या किड्यामुळे रातोरात करोडपती होता येतं हा दावा खोटा आहे. या किड्यामुळे कोणताही चमत्कार घडत नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा किडा चमत्कार घडवतो हा दावा असत्य ठरला. 

अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पैसे कमावण्यासाठी असे दावे केले जातात. अशा किड्यांनी रातोरात करोडपती होता आलं असतं तर आज सगळेच घरी बसून किड्याच्या मागे लागले असते.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x