पाण्यासाठी आलेल्या हत्तीणीनं पाण्यात बुडवून मगरीचा केला खेळ खल्लास, पाहा व्हिडीओ

हत्तीण आणि मगरीच्या शिकारीचा खेळ...पाहा कोण कोणावर पडलं भारी....व्हिडीओ

Updated: Oct 20, 2021, 10:56 PM IST
पाण्यासाठी आलेल्या हत्तीणीनं पाण्यात बुडवून मगरीचा केला खेळ खल्लास, पाहा व्हिडीओ

झाम्बिया: हत्ती तसा शांत प्राणी. विनाकारण तो कोणाच्याही वाट्याला जात नाही. मात्र त्याला नादाला कोणी लागलं तर तो काय सोडत नाही. एक नाही तर असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर हत्तीचे पाहायला मिळतात. तसंच मगरीची प्रवृत्ती ही कायम शिकारीची. पाणी प्यायला आलेल्या वाघावरही ती हल्ला करायचं सोडत नाही. अशा या मगरीलाच हत्तीनं चिरडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

झाम्बिया इथे एक हत्तीण आणि मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. तिथे फिरायला आलेल्या एका पर्यटकाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तिथे हत्तींचा कळप पाणी पिण्यासाठी नदीवर येतो. मगर आलेली शिकारीची संधी पाहून आपली शिकारीसाठी चाल खेळते. तेच तिला खूप महागात पडतं.

हत्तीच्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या मगरीला हत्तीणीनं पाहिलं. ती पुढे सरसावली आणि तिने या मगरीलाच पळताभुई थोडी केली. हत्तीणीनं पाण्यातच मगरीला जोरात आपटायला सुरुवात केली. हत्तीणीच्या तावडीतून सुटण्यासाठी मगरीने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र ते अपयशीच ठरले. 

चिडलेल्या हत्तीणीने मगरीला पाण्यातून फरफटत जमिनीवर आणलं. अखेर या मगरीची हालचाल बंद झाली. असं सांगितलं जातं की या हत्तीणीनं तिला ठार मारलं. या शिकारीच्या खेळात हत्तीण श्रेष्ठ ठरली तर मगरीला आपला जीव गमवावा लागला. शिकाराचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. मगरीला पिल्लावर हल्ला कऱण्याच्या बदल्यात आपले प्राण गमवण्याची वेळ आली.