Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. चीनमध्ये (China) घडलेल्या या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील बालसंरक्षण कायदे (child protection laws) अजून कडक केले जावेत अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.
South China Morning Post (SCMP) ने दिलेल्या वृत्तानुसार, 25 जून रोजी अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे. घऱात आईने काठीने मारहाण केल्याने घाबरलेला सहा वर्षांचा मुलगा खिडकीबाहेर लावण्यात आलेल्या एअर कंडिशन युनिटजवळ आला आणि नंतर उडी मारली. मुलगा बाहेरील कठड्यावर आल्यानंतर खालून जाणारे आणि शेजाऱ्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी ओरडत मुलाला मारु नका अशी विनंतीही केली. पण यानंतरही त्याची आई त्याला काठीने मारहाण करत होती. नंतर काही सेकंदात मुलाने अचानक उडी मारली.
खाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. चीनमधील सोशल मीडिया साईट Weibo वर हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
उडी मारल्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने त्याच्या जीवाला कोणताही धोक नाही. पण त्याची काही हाडं मोडली असून उपचार सुरु आहेत.
For safety purposes
Chinese mom hits son till he jumped off the window but he is alive#china #jump #sad #problem #usa #boy #accident #fight pic.twitter.com/SSopZDITQE— ahmad (@ahmedddaddy) June 27, 2023
पोलिसांनी नंतर Weibo वर दिलेल्या माहितीनुसार, खाली पडेल या भीतीपोटी त्याने आत यावं यासाठी त्याची आई त्याला मारहाण करत होती. ऑल-चायना वुमन फेडरेशनच्या सदस्याने सांगितले की, आउटलेटनुसार आई काठीने त्याला फक्त घाबरवत होती.
मात्र पोलीस आणि महिला आयोगाने दिलेल्या या स्पष्टीकरणावर नाराजी जाहीर केली जात आहे. प्रकरण मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नेटकरी करत आहेत.
Weibo वर अनेक युजर्सनी कमेंट केल्या असून, उडी मारण्यापेक्षा त्याला त्याच्या आईची जास्त भीती वाटत होती असं एकाने म्हटलं आहे. तर एका युजरने कमेंट केली आहे की, लोक त्याला मारु नका असं सांगत असतानाही त्याची आई थांबली नाही. मला काहीच कळत नाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Yan असं या मुलाचं आडनाव आहे. त्याचे वडील दुसऱ्या शहरात कामाला असून तो आपल्या आईसह राहतो.
Beijing Teenagers Law Aid and Research Centreने 2008 ते 2013 दरम्यान चिनी माध्यमांनी मुलांवरील हिंसाचाराच्या दिलेल्या वृत्तांचं परीक्षण केलं आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, 75 टक्के हल्ले जन्मदात्या पालकांकडून झाले आणि 10 टक्के प्रकरणांमध्ये सावत्र पालक किंवा तात्पुरते पालक जबाबदार होते.