Major Fire In China: सध्या चीनमधील एक बातमी चांगलीच चर्चिली जातेय, कारण चीनमध्ये एक इमारतीला भीषण आग लागल्याचा प्रकार घडलाय.(major fire in china) चीनमधील चांगशा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील 42 मजली इमारतीला भीषण आग लागली
आहे. आग इतकी भयंकर आहे कि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे दरम्यान मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात खालच्या मजल्यापासून वरपर्यंत आग लागल्याचे दिसत आहे.
या आगीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि आगीचं स्वरूप किती भीषण आहे घटनास्थळावरून दाट धूर निघत आहे आणि अनेक मजले जळत आहे
यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू केल्याचे सांगण्यात आले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.४८ वाजता इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या 36 गाड्या तिथे उपलब्ध असून सध्या आग विझवण्याचं काम जोरात सुरु होत.
सायंकाळी जवळपास पाच वाजले तरीसुद्धा ही आग धुमसत होती .मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत तरी एकही मृत्यूची नोंद नाहीये.
WATCH Major fire broke out in a high-rise telecom building in the central city of Changsha, China pic.twitter.com/vnaR0cNQLw
— Insider Paper (@TheInsiderPaper) September 16, 2022
या इमारतीत सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालयही आहे.
ही इमारत 2000 साली पूर्ण झाली. जेव्हा ती बांधली गेली तेव्हा ती चांग्शा शहरातील सर्वात उंच इमारत होती. त्याची उंची 218 मीटर होती. जमिनीपासून 42 मजले आहेत. यासोबतच दोन भूमिगत मजलेही आहेत.
长沙荷花园电信大厦,但愿没有人员伤亡 pic.twitter.com/oLT35TbazR
— Water (@lengyer) September 16, 2022