Viral Video: या दोन बेटांदरम्यान उडते सगळ्यात छोटी फ्लाइट, लागतात फक्त 1.5 मिनिटे

Worlds Shortest Flight: ही छोटी फ्लाइट झटपट तयार होणाऱ्या नूडल्सपेक्षाही फास्ट आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 17, 2024, 04:48 PM IST
Viral Video: या दोन बेटांदरम्यान उडते सगळ्यात छोटी फ्लाइट, लागतात फक्त 1.5 मिनिटे
Photo Credit: Freepik

Worlds Shortest Flight: रोड आणि ट्रेन प्रमाणेच विमानाने प्रवास करायचे प्रमाणही वाढले आहे. भारतातील अनेक ठिकाणी यासाठी विमानतळ आहेत. 
एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तर विमानाने किमान एक तास, दीड तास लागतो. याशिवाय आपल्याला दुसऱ्या देशात जायचे असेल तर अगदी दिवसही जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फ्लाइटचा प्रवास अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. होय तुम्ही नीट ऐकले. जगातील सर्वात लहान फ्लाइट आहे जी दोन बेटांदरम्यान उडते. ही वेस्ट्रे (Westray) आणि पापा वेस्ट्रे (Papa Westray) यांना जोडणारी, लोगनेअरद्वारे ( Loganair) चालविली जाते आणि दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणारी फ्लाइट आहे. 

Add Zee News as a Preferred Source

झटपट नूडल्सपेक्षा वेगवान फ्लाइट 

काहीवेळा, वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे दरम्यानच्या या छोट्या फ्लाइटची वेळ एका मिनिटापेक्षा कमी असते. यामुळे ही झटपट तयार होणाऱ्या नूडल्सपेक्षाही फास्ट फ्लाइट बनते. या मार्गावरील सर्वात वेगवान उड्डाणाची नोंद 53 सेकंद होती, जी पायलट स्टुअर्ट लिंकलेटरने केली होती. या मार्गावरील फ्लाइट मूलतः 1967 मध्ये सुरू झाली आणि याने जगातील सर्वात लहान नियोजित फ्लाइटचा विक्रम मोडला. हा प्रवास शनिवार वगळता दोन्ही दिशेने दररोज चालतो.

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

किती प्रवासी बसू शकतात?

हे उड्डाणासाठी ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलँडर विमान वापरते, ज्यामध्ये 10 प्रवासी बसू शकतात. हे विमान लहान असल्याने पुढच्या रांगेत बसलेले लोक पायलटला विमान उडवतानाही पाहू शकतात.

गेल्या काही वर्षांत, या छोट्या फ्लाइटने आपल्या अनोख्या आणि अत्यंत लहान प्रवासाचा अनुभव घेण्यास उत्सुक असलेल्या पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. एवढ्या कमी वेळेची फ्लाइट असूनही यामधून प्रवाशांना नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑर्कने बेटावरील शांत जीवनाची छान झलक देते.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More