मोबाईल पाहण्याच्या नादात केलेली चूक या मुलीला भलतीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी करतो.

Updated: Nov 24, 2021, 06:50 PM IST
मोबाईल पाहण्याच्या नादात केलेली चूक या मुलीला भलतीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियाचे जग हे खूपच मजेदार आहे. म्हणूनच तर आपल्यापैकी प्रत्येकजण सोशल मीडियावरती नेहमीच सक्रिय असतो. आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी करतो. येथे दररोज मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात. पण त्यातले काही इतके मजेशीर असतात की ते आपले मनोरंजन करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ एका मुलीशी संबंधित आहे जी फोनवर बोलत असताना असे काही करते, जे पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने लोकांनी त्याला लाईक देखील केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक मुलगी एस्केलेटरचा वापर करत असल्याचे दिसत आहे. ती त्यावर पायऱ्या चढत असते, पण कित्येक सेकंद उलटूनही ती वर काही पोहोचतच नाही.

खरंतर यामध्ये तिच्याकडून खूप मोठी चुक घडते. खरेतर मोबाईलच्या नादात ही मुलगी चुकीच्या दिशेने चालणाऱ्या एस्केलेटरचा वापर करते.

या मुलीला वर जायचं असतं आणि ती फोन बघता बघता खाली येणाऱ्या एस्केलेटरवरती जाते आणि वर चढण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे ती वर जाण्याएवजी उलट खालीच परत येते.

काही काळ गेल्यानंतर मग ती मुलगी जेव्हा फोनमधून आपलं डोकं बाजूला काढते तेव्हा तिला आपली चूक लक्षात येते. ज्यानंतर ती योग्य एस्केलेटरवरती जाते.

व्हिडीओमधील हा प्रकार खूपच मजेदार आहे. या मुलीची मोबाईलमुळे झालेली ही फजेती लोकांना खूपच आवडत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ hepgul5 वापरकर्त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यावर मजेदार कमेंट्स येत आहेत.