इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Updated: Feb 20, 2018, 05:52 PM IST
इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

सुमात्रा :  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

या स्फोटात अजून कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची माहिती समोर आलेली नाही.  आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर राख आणि धुरांचे लोट दक्षिणेकडे वाहत आहेत. त्यामुळे या भागात उड्डाण करणाऱ्या विमानांना रेड नोटीस देण्यात आली आहे. 

 

 

#february #19th #2018 #sinabung #sinabungmountain #gunungsinabung #sinabungerupsi

A post shared by Agnes (@agnezdiann) on

ज्वालामुखीच्या स्फोटमुळे गेल्या ५ वर्षांपासून या भागातील ३० हजार जणांना घर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

यापूर्वी २०१०मध्ये  या ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. यात दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. त्यानंतर २०१४ मध्ये स्फोट झाला होता. त्यात १६ जण ठार झाले होते.  तसेच २०१६ मध्ये या ज्वालामुखीचा स्फोट होऊन ७ जण ठार झाले होते.