धक्कादायक : गरोदर गायिकेवर यासाठी झाडली गोळी?

पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

धक्कादायक : गरोदर गायिकेवर यासाठी झाडली गोळी?

मुंबई : पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला आहे पाकिस्तानच्या दक्षिणी सिंध परिसरात 24 वर्षीय गरोदर महिला गायिकेला भर कार्यक्रमात गोळी झाडली आहे. या प्रकारामुळे सगळेजण धक्क्यात आहेत. या महिलेला गोळी का मारली याचं कारण अतिशय धक्कादायक आहे. 

नेमका काय घडला प्रकार? 

या गरोदर महिलेला गोळी मारण्याच कारण म्हणजे गायिका गाणं गाण्यासाठी उभी राहू शकली नाही. समीना सामून नावाची महिला गायिका 6 महिन्याची गरोदर होती. पाकिस्तानच्या कंगा गावमध्ये हा कार्यक्रम झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारिक जटोई नावाची व्यक्ती गायिकेला सतत उभं राहून गाण्याची मागणी करत होता. मात्र गरोदरपणामुळे ती उभी राहू शकली नाही म्हणून तिला स्टेजवर जाऊन गोळ्या मारल्या. न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, त्या गायिकेला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. मात्र तिने आपले प्राण सोडले. 

पाकिस्तानमध्ये घडला धक्कादायक प्रकार 

हा व्हिडिओ पाकिस्तानच्या एका मानव अधिकार कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कपिल देव नावाच्या व्यक्तीने ट्विट करून सांगितलं ती 6 महिन्याची गरोदर महिला होती. महिलेच्या नवऱ्याने तक्रार केली असून आता त्याच्यावर दबाव टाकण्यात येत आहे.