घरातील सदस्यांच्या मृत्यूनंतर, महिलांना कापावा लागतो शरीराचा 'हा' अवयव

ही परंपरा इतकी भयंकर आहे की, तुम्ही ती ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसेल.

Updated: Nov 1, 2021, 06:54 PM IST
घरातील सदस्यांच्या मृत्यूनंतर, महिलांना कापावा लागतो शरीराचा 'हा' अवयव title=

जकार्ता : प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांचे वेगवेगळ्या परंपरा असताता. ज्या आपल्याला माहित देखील नसताता. तर काही अशा विचित्र प्रथा आणि परंपरा असतात, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. भारतासह असे अनेक देश आहेत, जे आपल्या परंपरा सोडू इच्छित नाहीत. तसेच या देशातील अशा काही परंपरा आहेत, ज्यांवर त्या देशाच्या सरकारने बंदी घातली होती. परंतु त्या परंपरा अजुनही लोकांकडून पाळल्या जाता. इंडोनेशीयामध्ये देखील अशाच एका परंपरेवर सरकारने रोख लावली आहे.

ही परंपरा इतकी भयंकर आहे की, तुम्ही ती ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसेल. इंडोनेशियातील दानी जमातीच्या महिलांना ही धक्कादाय परंपरा पाळावी लागते, या परंपरेला इकिपलिन (Ikipalin) असे म्हणतात. या परंपरे अंतर्गत महिलांना घरातील सदस्यांच्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव कापावा लागतो.

तुम्हाला जर या परंपरेबद्दल माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत.

ही इंडोनेशियन परंपरा खूप धक्कादायक आहे

जेव्हा जेव्हा कोणी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावतो तेव्हा त्याला भावनिक वेदना होतात. लोक त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी पुढे येतात आणि एकमेकांना आधार देतात, परंतु इंडोनेशियातील दानी जमातीतील लोकं त्याहीपेक्षा जास्त वेदनादायी प्रकार करायला लावतात.

दानी जमातीच्या महिलांना भावनिक वेदनांसोबतच शारीरिक वेदनांनाही सामोरे जावे लागते. ज्यामध्ये त्यांच्या हाताची बोटं कापली जातात. परंतु यामध्ये हाताची संपूर्ण बोटं न कापता, बोटांवरचा काही भाग कापावा लागतो.

हा भाग कुऱ्हाडीने कापला जातो किंवा मग काही लोकं तोंडाने चावा घेतात आणि दोरीने घट्ट बांधून ते बोट ओढायचे, परंतु ही एक अमानुष परंपरा आहे.

अस्वस्थ आत्मा मृत व्यक्तीपासून दूर राहतो

असे मानले जाते की, बोट कापल्याने अस्वस्थ आत्मा मृत व्यक्तीपासून दूर राहतो, तसेच ते शोकातील वेदनांचे प्रतीक देखील आहे. एवढेच नाही तर काही माता स्वत: आपल्या मुलांची बोटे कापतात. यामागे त्यांचे असे मानने आहे की, असे केल्याने मुलांचे आयुष्य वाढते.

परंतु बोटे कापण्याच्या या असामान्य प्रथेवर इंडोनेशियन सरकारने काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. परंतु असे मानले जाते की, ही प्रथा अजूनही गुप्तपणे सुरू आहे.

शेवटी, या प्रजातीची लोकसंख्या किती आहे?

अडीच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली ही जमात पश्चिम न्यू गिनीच्या उंच आणि घनदाट भागात राहते. 1938 मध्ये, जेव्हा अमेरिकन संशोधक रिचर्ड आर्कबोल्ड याने या भागात उड्डाण केले, तेव्हा त्यांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, या जमातीचे पुरुष देखील त्यांच्या गुप्त भागांवर सुशोभित आवरण घालतात आणि त्यांच्या मृतांची ममी ठेवतात.