World Emoji Day 2022 - गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर वाढला. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करतो. या सोशल मीडियाच्या जगात आपल्या भावना शब्दांशिवाय सांगण्यासाठी इमोजीचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो. एखाद्या मेसेजवर क्षणात रिप्लाय द्यायचा असेल तर वेगवेगळ्या भावना दाखवणाऱ्या इमोजी आपल्याकडे असतात. त्या आपण लगेचच शेअर करतो. तुम्हाला इमोजीबद्दल ही गोष्ट माहिती आहे का?
या क्यूट इमोजीसाठी जगात दरवर्षी 'वर्ल्ड इमोजी डे' सेलिब्रेट केला जातो आणि यामध्ये एक मजेदार गोष्ट लपलेली आहे. कधी साजरा केला जातो 'वर्ल्ड इमोजी डे' आणि काय आहे यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
सहसा, एखादी गोष्टीचा शोध ज्या दिवशी लागतो त्या दिवशी तो दिवस साजरा केला जातो. मात्र इमोजी डेबद्दल एक विशेष गोष्ट आहे. वर्ल्ड इमोजी डे हा 17 जुलैला साजरा केला जातो. विशेष म्हणजे ही एकमेव तारीख आहे ज्यासाठी इमोजी आहे. लोकांना फेसबुकवर एकमेकांना मेसेज पाठवताना एक आवाज आला पाहिजे ज्यामुळे त्यांना कळेल की त्यांना संदेश आला आहे. यातून हे इमोजी शोधण्यात आले. याचा वापर पुढे सोशल मीडियावर तुफान व्हायला लागला. इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली. इमोजीपीडिया ही एक ऑनलाइन वेबसाइट आहे जी युनिकोड मानक म्हणून इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची सॉफ्टवेअरमध्ये काम करतं. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.
तुम्ही पण या लोकप्रिय इमोजीचा वापर दररोज करत असाल. हा इमोजी म्हणजे 'टीयर ऑफ जॉय इमोजी' म्हणजेच आनंदाचे अश्रू दाखवणारी इमोजी. ही इमोजी आपल्याला एखादा विनोदी मेसेज आला असेल तर त्यावर आपण वापरतो. त्याशिवाय असे अनेक इमोजी आहेत ज्यांचा वापर आपण रोज करतो. सध्या काळात इमोजी हे आपली भावना व्यक्त करण्याचे सगळ्या बेस्ट माध्यम झाले आहे.