वॉशिंग्टन : सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद संभाव्य रासायनिक हल्ल्याची तयारी करत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येत सामन्य नागरिकांची हत्या होऊ शकते, असा इशारा व्हाईट हाऊसने दिला आहे. सीरियाचे प्रशासनाने असे काही पाऊल टाकले तर याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेने सिरीयाला दिला आहे.
असद प्रशासनाने अशा प्रकारे तयारी केली आहे, जशी विद्रोहीच्या ताब्यात असलेल्या शहरांवर त्यांनी यापूर्वी जशाप्रकारे रासायनिक हल्ला केला होता. यापूर्वी केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने सीरियाच्या हवाईदलाच्या तळावर हल्ला केला होता.
व्हाइट हाऊसचे प्रवक्ता सीन स्पाइसर यांनी सांगितले की, अमेरिकला माहिती मिळाली आहे की असद प्रशासन संभाव्य आणखी एक रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्दोष मुलांची आणि सामान्य नागरिकांची हत्या होऊ शकते.
ही तयारी ४ एप्रिल २०१७ ला करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्याप्रमाणे आहे. असद यांना रशियाचे समर्थन आहे. दरम्यान, विद्रोहीच्या ताब्यात असलेल्या शेखून शहरावर रासायनिक हल्ला केल्याचा आरोपांचा इन्कार केला आहे.