ती कोण होती जिच्यामुळे महिलांनीही पँट घालायला सुरुवात केली...कारणही तसंच होतं...

महिलांची पॅन्ट किंवा ट्राउझर घालण्याची फॅशन कधी आणि कोणी सुरु केली? आज आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.

Updated: Jun 6, 2021, 06:21 PM IST
ती कोण होती जिच्यामुळे महिलांनीही पँट घालायला सुरुवात केली...कारणही तसंच होतं... title=

मुंबई : पश्चिम अफ्रिकेतील तंजानियामधील एक किस्सा सध्या चर्चेचा भाग बनला आहे. कारण येथील एक महिला संसद पॅन्ट घालून संसदेतील अधिवेशनात आली, ज्यामुळे तिला अधिवेशना बाहेर काढले गेले. यानंतर सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तुम्ही कधी विचार केलाआहात का की, महिलांची पॅन्ट किंवा ट्राउझर घालण्याची फॅशन कधी आणि कोणी सुरु केली? आज आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.

महिलांची फॅशन बदलण्याचे श्रेय फ्रेंच फॅशन डिझायनर कोको शेनेल यांना जाते.आजच्या युगात कोको शेनेलला केवळ अत्तरासाठीच लक्षात ठेवले जात आहे. 1970 मध्ये लंडनमधील हॅरोड्स स्टोअरने ट्राऊझर्स घातलेल्या महिला ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. 20 व्या शतकातही बर्‍याच ठिकाणी महिलांनी पॅन्ट घातल्याने त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले गेले आहे किंवा अक्षेप घेतले गेले आहे.

पहिल्या महायुद्धानंतर कोको शेनेलने महिलांची फॅशन बदलली. खरेतर कोस्टच्या प्रवासादरम्यान कोको शेनेल पुरुषांच्या फॅशनमुळे प्रभावित झाल्या. ज्यामुळे त्यांनी 1920 मध्ये स्वत: साठी ट्राउझर्स बनवल्या आणि अशा प्रकारे पॅन्टचा ट्रेंड सुरू झाला.

शेनेलने पॅन्टचे डिझाइन बनवले ते सगळे सरळ आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांशी मिळते जुळते होते. कोको शेनेलने महिलांसाठी टायचा ट्रेंड देखील सुरू केला होता. असे म्हटले जाते की, कोको शेनेलने फॅशनच्या बाबतीत सगळ्या गोष्टींना पुढे आणले, जे फॅशन स्त्रियांसाठी नव्हत्या त्या सगळ्या फॅशनही तिने आणल्या आहेत.

शेनेल ही अशी व्यक्ती आहे, जिने पाश्चात्य फॅशनमध्ये क्रांती केली. तिचे सर्वात मोठे यश म्हणजे 'लिटल ब्लॅक ड्रेस' - एक साधा पण मोहक काळा ड्रेस जो आजच्या काळात घालणे सहज शक्य आहे. परंतु त्या युगात शेनेलने जी फॅशन आणली ती फेमिनिस्ट मूवमेंट ठरली.

सुरवातीला स्त्रिया मोठे आणि संभाळायला अवघड असणारे कपडे घालायचे ज्यामध्ये त्यांना घट्ट कॉर्सेटमध्ये रहावे लागत होते. फ्रान्सच्या शेनेलने महिलांना या कपड्यांच्या कैदेतून मुक्त केले आणि महिलांसाठी पुरुषांसारखे कपडे बनवले. शेनलेमुळेच आज महिला पॅन्ट घालत आहेत. केवळ कपडेच नव्हे तर शूजपासून हँडबॅग आणि दागिन्यांपर्यंत शेनेलने सर्व काही बदलले आहे. तिचे खास परफ्यूम कित्येक दशकांनंतरही, जगातील नामांकित परफ्यूमचा एक भाग आहे.