Cyclone Tauktae: कोणी दिलं चक्रीवादळाला 'तौक्ते' हे नाव, काय आहे त्याचा अर्थ?

भविष्यकाळातील चक्रीवादळांची नावे हिंद महासागरातील या देशांनीही ठरविली आहेत. 

Updated: May 15, 2021, 08:47 PM IST
Cyclone Tauktae: कोणी दिलं चक्रीवादळाला 'तौक्ते' हे नाव, काय आहे त्याचा अर्थ?

नवी दिल्ली : देशाच्या नैऋत्य राज्यांतील तौक्ते चक्रीवादळासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे एनडीआरएफची 53 पथके प्रभावित राज्यात तैनात आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ तौक्तेमुळे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात नुकसान होऊ शकते. विभागाच्या म्हणण्यानुसार 17 मे रोजी हे वादळ धोकादायक रुप घेऊ शकतं. या वादळामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पूर येऊ शकतो.

याआधी आम्फान या चक्रीवादळाने कहर केला. अम्फानच्या आधी कटरीना, निवार, निसर्ग, हुदहुद, फानी, बुलबुल, ​हिकाका, लैरी, ​लीजा या वादळांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी व नुकसानीचा सामना करावा लागला होता.

चक्रीवादळाच्या वेगवेगळ्या नावांमुळे ते चर्चेत येतात. यामागेही एक इतिहास दडलेला आहे. चक्रीवादळांच्या नावे ठेवण्यास अटलांटिक प्रदेशात 1953 च्या कराराने सुरुवात झाली. तर हिंद महासागर प्रदेशात ही प्रणाली वर्ष 2004 मध्ये सुरू झाली. भारताच्या पुढाकाराने या भागातील देशांनी वादळांना नावे दिली. या व्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंड यांचा समावेश होता. 2018 मध्ये युएई, इराण, कतार आणि येमेनसह अनेक देश या क्लबमध्ये सामील झाले.

म्यानमारने दिले तौक्ते नाव

हिंदी महासागरात उद्भवणार्‍या चक्रीवादळाला नाव देण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. त्याअंतर्गत हिंद महासागराच्या प्रदेशात वादळ होण्याची शक्यता असल्यास, भारतासह 13 सदस्यांनी त्यांची संख्या येतांना अक्षरांना त्यास विशेष नाव दिले आहे. यावेळी वादळाला नाव देण्याची वेळ म्यानमारची होती. या वादळाचे नाव त्यांनी तौक्ते ठेवले. याचा अर्थ - याचा अर्थ आवाज करणार पाल असा होतो.

भविष्यकाळातील चक्रीवादळांची नावे हिंद महासागरातील या देशांनीही ठरविली आहेत. या यादीनुसार पुढचं नाव ओमानने दिलेले यास आणि पाकिस्तानने दिलेले गुलाब असं असेल. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या नावांची नवीन यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी पुढील 25 वर्षांसाठी बनविली जाते.

या वादळांना भारताने दिले नाव

या नव्या यादीमध्ये भारताने तेज, गती, मुरासू (तमिळ वादक), आग, नीर, प्रभंजन, घुरनी, ​​अंबुद, जलाधी, वेग अशी नावे नोंदविली आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने अर्णब, पाकिस्तानने लुलू, कतारने शाहीन आणि बहार अशी नावे दिली आहेत.