जगभरात या लोकांनी पसरवला कोरोना व्हायरस

कोरोना महामारी बनण्याला कोण जबाबदार?

shailesh musale Updated: Mar 28, 2020, 12:29 PM IST
जगभरात या लोकांनी पसरवला कोरोना व्हायरस

मुंबई : चीन, युरोप आणि अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम इराण आणि दक्षिण कोरियावर पाहायला मिळतो आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा सर्व जगाने स्वत:च्या स्तरावर हा विषाणू टाळण्याचा मार्ग स्वीकारला, तर मग हा रोग कसा महामारी बनला? देश कोणामुळे संकटात आला.?

काही सरकार आणि लोकांच्या दुर्लक्षपणामुळे आणि काही लोकांच्या जिद्दीपणामुळे कोरोनाचा विषाणू जागतिक महामारी बनली. हे असे लोक आहेत ज्यांनी आपला आजार जाणूनबुजून लपवून ठेवला. एका अहवालानुसार थर्मल स्कॅनिंगच्या वेळी पकडले जाऊ नये म्हणून जगभरातील लोक आणि विशेषत: भारतात काही लोकं पॅरासिटामोल टॅब्लेट घेत होते. या कारणास्तव संपूर्ण जगात आज ही स्थिती तयार झाली आहे. कारण हे लोक विमानतळाबाहेर पडले आणि त्यांच्या स्वतःच्या देशात हा संसर्ग पसरला.

दक्षिण कोरियात एका महिलेने पसरवला कोरोना

राजधानी सिओलच्या चर्चशी जोडलेली एक महिला आपल्याया कोरोना झाला आहे हे माहित असताना देखील चर्चमध्ये गेली. त्यानंतर ती चर्चमधील आणि बाजारपेठेतल्या रेस्टॉरंटपर्यंत शेकडो लोकांना भेटली. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही भाग घेतला. नंतर त्याच महिलेमुळे दक्षिण कोरियामध्ये पाच हजार लोकांना कोरोना झाला.

इराणला कोरोनाचा धोका लक्षात आला नाही

चीनसारख्या इराणलाही सुरुवातीला या आजाराची माहिती नव्हती. याचा परिणाम म्हणून इराणमधील बहुतेक सर्व प्रांतांमध्ये कोरोना पसरला. मिळालेल्या माहितीनुसार इराणचे 23 खासदार कोरोनाग्रस्त आहेत. त्यांना सध्या वेगळं ठेवण्यात आलं आहे.  आहेत. पण इथेही परिस्थिती चीन किंवा इटलीपेक्षा कमी वाईट नाहीये. चीनने कोरोनावर मात करण्यासाठी कठोर कायद्यांचा अवलंब केला आहे.

कोरोना लपवणाऱ्यांना तुरुंगात टाकणार चीन

एखादी कोरोना झालेली व्यक्ती परदेशातून खास करुन अमेरिकेतून चीनमध्ये आली तर त्याला सात वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. चीनमधील बऱ्याच लोकांना माहिती लपवण्यासाठी शिक्षा झाली आहे. असे सांगितले जात आहे की या लोकांनी विमानतळावर उतरण्यापूर्वी पॅरासिटामोलचीही मदत घेतली होती. ज्यामुळे ते थर्मल स्क्रिनिंगमध्ये संशयित आढळले नाही.