Corona XE Verient : कोविडच्या रुग्णांमध्ये भारतात एककडे घट होत असताना काही देशांमध्ये मात्र रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा हा संसर्ग नव्या व्हेरिएंटमुळे होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा आता आणखी एक नवीन प्रकार आढळला आहे. ज्याला XE असं नाव देण्यात आला आहे. या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. Omicron पेक्षा ही हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचं म्हटलं जात आहे.
चिंतेची बाब म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात तिसरी लाट आली होती.
Omicron BA.1 आणि BA.2 चे रीकॉम्बिनंट
WHO ने कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांबद्दल सर्वांना आधीच अलर्ट केले होते. डेल्टाक्रॉन हे पहिले रीकॉम्बिनंट होते आणि अलीकडच्या काळात कोरोना विषाणूचे आणखी काही रिकॉम्बिनंट्स समोर आले आहेत, त्यापैकी एक फ्लुरोना आहे. XE हे omicron BA.1 आणि BA.2 चे रीकॉम्बिनंट आहे, म्हणजेच तो या दोन उप-प्रकारांनी बनला आहे.
डब्ल्यूएचओने आपल्या नवीन अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत यूकेमध्ये XE च्या एकूण 637 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
WHO कोरोना विषाणूच्या या प्रकारांचे वर्णन 'चिंतेचे स्वरूप' म्हणून करते आहे. हे मानवजातीसाठी हानिकारक असू शकते आणि संसर्गाचा दर देखील उच्च असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अहवालानुसार, हा प्रकार ओमायक्रॉनपेक्षा 10 पट वेगाने पसरू शकतो. कोविडच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या ओमायक्रॉन प्रकाराने सध्या चीनमध्ये कहर केला आहे. मार्चमध्ये चीनमध्ये कोविडची एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती, त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे शांघायमध्ये आढळून आली होती.