मित्रासाठी मित्राने केलेलो 'तो' त्याग आज 'Friendship day' म्हणून होतोय साजरा

'त्या' दोन मित्रांच्या आयुष्यातील तो दिवस...  आज आंतरराष्ट्रीय स्तरावर 'फ्रेंडशिप डे' म्हणून होतोय साजरा  

Updated: Aug 7, 2022, 01:33 PM IST
मित्रासाठी मित्राने केलेलो 'तो' त्याग आज 'Friendship day' म्हणून होतोय साजरा title=

मुंबई : आज Friendship day.... म्हणजे मैत्रीचा दिवस. शाळेत, कॉलेजमध्ये प्रत्येक जण आपल्या मित्रांसोबत मैत्रीचा दिवस साजरा करतो. आयुष्यात चांगल्या वाईट प्रसंगी आपल्यासोबत निडर उभा राहणारा व्यक्ती म्हणजे 'सच्चा दोस्त...' ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे 'Friendship Day'. पण आपण आजचा दिवस का साजरा करतो हे तुम्हाला महित आहे. जाणून घ्या का साजरा केला जातो  'Friendship Day'

1935 मध्ये अमेरिकेतील एका घटनेनंतर फ्रेंडशिप डेला सुरुवात झाली. या एका घटनेमुळे ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण आज अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो. या दिवशी एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी जीव दिला होता. म्हणून त्यांची आठवण म्हणून आज हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.

असं म्हटलं जातं की, 1935 मध्ये अमेरिकेच्या सरकारने एका निर्दोष व्यक्तीची हत्या केली होती. त्यानंतर दु:खी झालेल्या त्याच्या मित्राने देखील आत्महत्या केली.  तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होऊ लागला. दक्षिण अमेरिकेतील लोकांनी त्या निर्दोष मित्रांच्या मृत्यूवर राग व्यक्त केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या सरकारला त्यांची गोष्ट ऐकावी लागली. पण यासाठी 21 वर्ष लागले.

1958 मध्ये अमेरिका सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आणि संपूर्ण जग ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करु लागला. पण भारतात फ्रेंडशिप डेचं हेच महत्त्व आहे असं नाही. कारण भारतात मैत्रीचे अनेक उदाहरण आहेत. महाभारत आणि रामायणात असलेली मैत्री भारतीय लोकांना आजही आकर्षित वाटते. हनुमान, सुग्रीव, कृष्ण, सुदामा यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही दिले जाते. 

फ्रेंडशिप डे रविवारी सेलिब्रेट केला जात असल्याने त्याची मज्जा आणखीच वाढते. अनेक जण या निमित्ताने सिनेमाला जातात तर कॉलेजमध्ये हाताला फ्रेंडशिप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा केला जातो.