Women Sleeps 22 Hours: दिवासातील 22 तास झोपलेली असते ही महिला! एकदा तर थेट 4 दिवसांनी झालेली जागी

Woman Sleeps For 22 Hours A Day: दिवसभरात तुम्ही किती तास झोपता? 8 ते 9 तास किंवा त्याहूनही कमी, बरोबर ना? मात्र जगातील एक महिला दिवसातील 22 तास झोपेत असते. सध्या जगभरात ही महिला चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Mar 4, 2023, 01:46 PM IST
Women Sleeps 22 Hours: दिवासातील 22 तास झोपलेली असते ही महिला! एकदा तर थेट 4 दिवसांनी झालेली जागी title=
22 hrs sleep

Woman Sleeps For 22 Hours: झोपाळू राजकुमारीची गोष्ट आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी ऐकली असेल. सतत झोपून असणारी ही राजकुमारी किती सुंदर होती आणि तिला जागं करण्यासाठी राजकुमाराने घेतलेले कष्ट वगैरे असे कथानक असलेली गोष्ट केवळ परीकथा असून खरोखर एवढं झोपाळू नको कोणी असू शकेल का असा प्रश्न पडतो. मात्र इतकं झोपणारं कोणीच नसू शकतं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. जगात खरोखर एक अशी माहिला आहे जी दिवसातील 18 ते 22 तास झोपते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरोखरच या महिलेचं रुटीन असं तयार झालं आहे की तिला आता यामधून बाहेरच पडता येत नाहीय.

एकदा चार दिवसांनी उठली

'मिरर' या परदेशी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या रियल लाइफ राजकुमारीचं नाव आहे जोआना कॉक्स (Joanna Cox) असं आहे. जोआनाच्या दिवसातील बराचसा कालावधी हा झोपण्यातच जातो. 38 वर्षीय जोआना तर एकदा झोपली आणि त्यानंतर थेट 4 दिवसांनी झोपेतून उठली होती. न खातापिता झोपून राहिलेल्या जोआनाला 4 दिवस कसे गेले हेच समजलं नाही. बरं जोआना मुद्दाम एवढा वेळ झोपते असंही नाही. जोआनाच्या या अघोरी झोपेसाठी एक विचित्र आजार कारणीभूत आहे. या आजारामुळेच जोआनाला फार काळ जागं राहता येत नाही.

दोन मुलांची आई आहे जोआना

जोआना कॉक्सला (Joanna Cox) जी व्याधी झाली आहे त्यामुळे ती दिवसातील 22 तास झोपून असते. या आजाराला आइडोपॅथिक हायपरसोम्निया (idiopathic hypersomnia) असं म्हतात. ही एक दुर्मिळ व्याधी असून फारच कमी लोकांमध्ये अशी समस्या दिसून येते. मात्र ज्याला ही व्याधी जडते त्याला कधीच झोप पुरी झाली आहे असं वाटत नाही. झोप त्यांच्या नियंत्रणता नाही तर तो झोपेच्या नियंत्रणात असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जोपर्यंत जोआनाला या आजाराबद्दल ठाऊक नव्हतं तोपर्यंत ती केव्हाही झोपायची. नाईट आऊटला गेल्यानंतर ती गाडीच्या मागच्या सीटवर पूर्णवेळ झोपलेलीच असायची. 2 मुलांची आई असलेली जोआना जेवण करण्यासाठीही फारच कष्टाने झोपेतून उठायची. ती प्रोटीन शेक आणि रेडी टू ईट फूडवर अवलंबून राहायची.

तिच्या स्मृतीवरही झाला परिणाम

जोआना ही दिवसातील बराच वेळ झोपलेली असल्याने तिच्या बुद्धीवरही याचा परिणाम होऊ लागला आहे. अनेकदा ती जाणीवपूर्वकपणे जागं राहण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला असं करताना चित्रविचित्र गोष्टी दिसू लागतात. अनेकदा तिला आपल्या बेडवर मोठ्या आकाराचे कोळी फिरत असल्याचा भास होतो. जोआनाला 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात या आजाराबद्दलची माहिती मिळाली. या आजाराने माझं आयुष्य उद्धवस्त झालं आहे कारण यामुळे मला कामच करता येत नाही असं जोआनाचं म्हणणं आहे. ड्रायव्हिंगपासून ते कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आता जोआनाला करता येत नाहीत. अनेक गोळ्या आणि औषधांचा वापर करुनही तिला दिवसातून केवळ 12 तासच जागता येतं.