Moon Change Position : गेल्या काही वर्षात ऋतूचक्र सातत्यानं बदलतंय. जगाला महाभंयकर अशा वादळांचा, पुराचा सामना करावा लागतोय. त्यातच आता नासानं एक धोक्याचा इशारा दिलाय. चंद्रामुळे पृथ्वीवर विनाशकारी महापूर येईल अशी भीती नासानं व्यक्त केलीय. जेव्हा प्रलयाची सुरूवात होते तेव्हा सगळीकडे दिसतो तो फक्त निसर्गाचा हाहाकार. सागरी किना-यांवर येणारं वादळ आणि महापूर तसं नवीन नाही. समुद्राच्या महाकाय लाटा संपूर्ण शहर उद्धवस्त करून टाकतात. येत्या काळात पृथ्वीवर एक असं संकट येणार आहे. ज्यामुळे सगळी पृथ्वीच जलमय होणार आहे. पृथ्वीवरच्या या विनाशकारी महाप्रलयाला कारणीभूत असेल साडेतीन लाख किलोमीटर दूर असलेला चंद्र.
नासाच्या अभ्यासानुसार 2030 मध्ये समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे समुद्राला प्रचंड मोठी भरती येईल. ज्यामुळे पृथ्वीचा बराचसा भाग जलमय होईल. या विनाशकारी महाप्रलयाचं कारण असेल चंद्र...कारण चंद्र आपली जागा बदलत असल्यानं अक्राळविक्राळ भरतीच्या लाटा धडकणार आहेत.
नेचर जर्नलमध्ये नासाचा हा अहवाल प्रसिद्ध झालाय. नासाची भविष्यवाणी खरी ठरली तर किनारी भागात सातत्यानं पूरस्थिती निर्माण होईल. शिवाय या महाप्रलयामुळे होणा-या नुकसानीचं प्रमाण खूप जास्त असेल. घरं, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं पाण्याखाली जातील. सततच्या प्रलयामुळे लोकांचं जगणं कठीण होऊन बसेल
चंद्राच्या गुरूत्वाकर्षणशक्तीमुळे समुद्रात भरती, ओहटीची प्रक्रिया सुरू असते. चंद्रामुळेच आतापर्यंत समुद्र संतुलित राहिलाय. पण चंद्राने आपल्या कक्षेत जराही बदल केला तर हे संतुलन बिघडणार. नासाच्या दाव्यानुसार चंद्र दर साडेअठरा वर्षांनी मूळ जागेपासून हलकासा सरकतो. अर्ध्या काळात तो समुद्रातील लाटांवर दबाव निर्माण करतो तर अर्ध्या काळात लाटांचा वेग वाढवतो.
नासाच्या म्हणण्यानुसार आता लाटांचा वेग वाढण्याचा काळ आहे. ही प्रक्रिया 2030 पर्यंत सुरू होईल. या काळात समुद्राची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली असेल आणि असं झालं तर मोठ्या विनाशाची शक्यता आहे.
|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.