खळबळजनक! सेक्सुअल ऍक्टिव्हिटीदरम्यान बाथमरूममध्ये महिलेचा मृत्यू

 एक महिला बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आली. ही घटना लक्षात येण्याआधी त्या खोलीतून एका तरुणाला बाहेर निघताना पाहिलं गेलं होतं. 

Updated: May 12, 2022, 03:24 PM IST
खळबळजनक! सेक्सुअल ऍक्टिव्हिटीदरम्यान बाथमरूममध्ये महिलेचा मृत्यू title=
representative image

मुंबई : एक महिला बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आली. ही घटना लक्षात येण्याआधी त्या खोलीतून एका तरुणाला बाहेर निघताना पाहिलं गेलं होतं. सुरूवातीला पोलिसांनी त्याच तरुणाला आरोपी समजलं. परंतू सत्य वेगळंच होतं.

रोमान्स दरम्यान, एडवेंचर करण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती तपासानंतर समोर आली आहे. महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये मिळाला होता. पोलिसांनी या घटनेला हत्या समजून तपास सुरू केला होता.

ब्रिटनच्या स्टॅफोर्डशायरमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. सँड्रा मुरे नावाची एक महिला आपल्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृत आढळून आली. मेडिकल टेस्टमध्ये आढळून आले की, मृत्यूच्यावेळी महिलेच्या शरीरात मंकी डस्ट हा नशेचा पदार्थ आढळून आला.

तपासादरम्यान माहिती मिळाली की, महिलेचा मृतदेह आढळून आला त्याच्या काही वेळ आधी एक तरुण तेथून बाहेर पडला होता. परंतू अंतिम तपासात महिलेचा मृत्यू सेक्शुअल ऍक्टिव्हिटीदरम्यान झाला आहे हे स्पष्ट झाले. 

सँड्रा ही 40 वर्षीय महिला सेक्स वर्क देखील करीत होती. ती फक्त महिलांसाठी बनलेल्या ब्लॉकमध्ये राहत होती. तेथे पुरूषांना येण्यास बंदी होती. परंतू तिच्या घराच्या खिडकीतून पुरूष ये-जा करीत असत. 

सँड्राचा मृत्यू 31 मे 2021 रोजी झाला होता. त्यादिवशी मध्यरात्रीपर्यंत सँड्राला इमरजन्सी सर्विस स्टाफने पाहिलं होतं. 

एका स्टाफने सांगितलं की, 12.30 वाजता महिलेचा आवाज आला होता. त्यानंतर मी त्यांचा दरवाजा ठोठावला. पुन्हा 1 वाजेदरम्यान आवाज आला. त्यानंतर त्या ठिका आहेत ना..? हे मी ओरडून विचारले. परंतू काही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मला कोणतीही शंका आली नाही.

 
सकाळी साधारण 7.55 वाजता मला त्या खोलीतून तरुण बाहेर पडताना दिसला. त्या तरुणाला मी कधीही पाहिले नव्हते म्हणून मी खोलीत गेलो तर त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मी रुग्णवाहिका बोलावली.