१० वर्षापासून कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म, सगळेच हैराण

धक्कादायक घटना आली समोर

Updated: Jan 7, 2019, 01:29 PM IST
१० वर्षापासून कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म, सगळेच हैराण title=

नवी दिल्ली : अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुग्णालयात गेल्या १० वर्षापासून कोमामध्ये असलेल्या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर सगळेच हैराण झाले आहेत. पोलीस आणि रुग्णालयातील कामगारांना हे कळत नाही आहे की हे कसं झालं. महिला अमेरिकेच्या ऐरिजोना राज्यातील हॅसिएंडा हेल्थकेअरमध्ये जवळपास १० वर्षापासून भरती आहे.

२९ डिसेंबरला या महिलेला अचानक पीडा सुरु झाल्या. त्यानंतर या महिलेचा हळू आवाज येऊ लागला. त्यामुळी त्यांना कळालं नाही की नेमकं काय होत आहे. पण नंतर कळालं की ही महिला प्रेग्नेंट आहे. महिलेने आता एका मुलाला जन्म दिला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. रुग्णालयातील कर्मचारी संशयाच्या भौऱ्यात आहेत. रुग्णालयातील इतर रुग्ण देखील या घटनेमुळ हैराण झाले आहेत. या घटनेसी सर्व स्तरातून निंदा होत आहे.

या महिलेसाठी एका मानव अधिकार कार्यकर्त्याने आवाज उठवला आहे. टाशा मेनेकर नावाची ही महिला वकील आहे. रुग्णालातील पुरुष कर्मचाऱ्यांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐरिजोनाचे गव्हर्नर डग डेजी यांच्याकडे देखील ही माहिती पोहोचली. त्यांनी या घटनेवर दु:ख जाहीर केलं आहे. रुग्णालयाला आदेश देण्यात आले आहे की, त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे.