गर्लफ्रेंडशी खोटं बोलून तो क्लबमध्ये गेला... पण तिने त्याला अचूक टिपला..

 तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल आणि खोटं बोलत असेल, तर तुम्हाला धक्काच बसेल. नाही का..?  असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर तो किंवा ती पूरता खचून जाऊ शकतो. 

Updated: Apr 4, 2022, 04:02 PM IST
गर्लफ्रेंडशी खोटं बोलून तो क्लबमध्ये गेला... पण तिने त्याला अचूक टिपला.. title=

मुंबई : तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल आणि खोटं बोलत असेल, तर तुम्हाला धक्काच बसेल. नाही का..?  असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर तो किंवा ती पूरता खचून जाऊ शकतो. 

एका तरुणीचा बॉयफ्रेंड तिची फसवणूक करीत होता. परंतू तिने त्याला स्ट्रिप क्लबमधून रंगेहात पकडले. तरुणीने तिच्या पार्टनरच्या कारमध्ये ट्रॅकर लावला होता. ज्याच्या मदतीने ती त्याचा पाठलाग करीत तिथे पोहोचली.

मिसी पीटरसन नावाच्या तरुणीने तिची कथा टिकटॉकवर शेअर केली आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, मिसीला तिच्या पार्टनरने तिला फसवले आणि तो कुठे आहे याबाबत, चुकीचे लोकेशन शेअर केले. तरीही तिने त्याच्या लोकेशनचा अचूक मागोवा घेतला आणि कळले की, तो स्ट्रिप क्लबमध्ये होता. तेथे दुसऱ्या मुलींसोबत मजा करीत होता.

मिस्सी म्हणाली, 'मी माझ्या बॉयफ्रेंडच्या कारमध्ये ट्रॅकर लावला होता, त्यामुळे तो स्ट्रिप क्लबमध्ये गेल्याचे मला समजले. मी तिथे गेले,  आपल्या गर्लफ्रेंडला पाहून त्याला धक्का बसला. त्याचवेळी तिच्या मैत्रिणीने म्हटले की, 'तुला शो बघायचा होता, चल मी तुला शो दाखवते...'

हा व्हिडिओ 39 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मिसीच्या या व्हिडिओला 39 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सोशलमीडियावर या प्रकरणावर खूप चर्चा सुरू आहे.