भूतकाळातील वेदना महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात

'वेदना कशाप्रकारे लक्षात ठेवल्या जातात हे जर आपण हे समजू शकलो तर आपण पीडित व्यक्तींची नक्कीच मदत करण्यात यशस्वी होऊ'

Updated: Jan 14, 2019, 12:00 PM IST
भूतकाळातील वेदना महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात

टोरंटो : पुरुषांच्या तुलनेत महिला भूतकाळातील आपल्या सोबत घडलेल्या वेदनादायक गोष्टी लवकर विसरतात, असा खुलासा एका संशोधनात करण्यात आलाय. या संशोधनासाठी उंदीर आणि मानवाचा वापर करण्यात आला. कॅनडाच्या टोरंटो मिसिसॉगा विद्यापीठाच्या (यूटीएम) संशोधकांनी हे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करत ही गोष्ट समोर आणलीय. 

शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषांच्या आपल्या आयुष्यातील वेदनादायी - त्रासदायक अनुभव वेगवेगळ्या पद्धतीनं आठवणीत ठेवतात. पुरुष भूतकाळातील वेदनादायी अनुभव स्पष्ट रुपात लक्षात ठेवतात. तर महिला मात्र जास्त संवेदनशील असूनही आपल्या वेदनादायी अनुभवांचा त्रास आणि ताणात रुपांतर करून घेत नाहीत.

वेदनेची आठवण वेदनेसाठी प्रेरकाचं कार्य करत असेल आणि वेदना कशाप्रकारे लक्षात ठेवल्या जातात हे जर आपण हे समजू शकलो तर आपण पीडित व्यक्तींची नक्कीच मदत करण्यात यशस्वी होऊ, असं मत यूटीएमचे सहाय्यक प्रोफेसर लॉरेन मार्टिन यांनी व्यक्त केलंय.