मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अऩेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. त्यामुळे वैयक्तिक संगणकांची मागणी देखील वाढली आहे. आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या मते, यावर्षी लॅपटॉप आणि कम्यूटरच्या मागणीमध्ये 11.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लॉकडाऊन काळात संगणक, लॅपटॉप आणि डेस्कटॉपची मागणी वाढल्याने 7.23 कोटी युनिट्सची विक्री झाली. लॅपटॉप व डेस्कटॉपची सर्वाधिक विक्री युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि अमेरिकेत झाली. अहवालात असे म्हटले आहे की, एचपी लॅपटॉप सर्वाधिक विकले जात आहेत, यातील 25 टक्के लॅपटॉप विकले गेले आहेत. त्यानंतर, एकूण लॅपटॉपपैकी 24.1 टक्के लेनोवोचे आहेत. तर 16.1 टक्के वाटा डेलचा आहे.
यावेळी, Apple ने 55 लाख युनिट्स विकल्या आणि त्यांना 7% मार्केट शेअर मिळाला. याव्यतिरिक्त, एसरने बाजारातील 6.7 टक्के हिस्सा विकला आणि पाचव्या स्थानावर स्थान मिळविले.
आयडीसीचे म्हणणे आहे की एकूण पाच संगणक विक्रीपैकी या पाच कंपन्यांनी 80 टक्के हातभार लावला, पण असे मानले जात आहे की येत्या काही वर्षांत त्यात बदल होऊ शकतात. आयडीसीचे म्हणणे आहे की, वैयक्तिक संगणकांची मागणी जुलैनंतर पुन्हा कमी होऊ शकते.' पण आता जुलैनंतर जर पुन्हा वर्क फ्रॉम होम वाढला तर याची मागणी आणखी वाढू शकते.
भारत सरकारने आयटी आणि आयटीईएस (BPO) इंडस्ट्रीला डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होमसाठी सूट दिली आहे. सरकारने देशात कोरोना संक्रमणाचा वाढता धोका पाहता या दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सूट दिली होती. आता ही सूट डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इतकंच नाही तर दूरसंचार विभागात देखील डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होमची सूट देण्यात आली आहे.
दूरसंचार विभागाने म्हटलं की, 'कोविड-19 संबंधित वाढत्या चिंता पाहता 31 डिसेंबरपर्यंत ही सूट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.'
दूरसंचार विभागाने ट्विट करत म्हटलं की, 'कोविड-19 बाबतच्या चिंता वाढत चालल्या आहेत. त्यामुळे DoT ने 31 डिसेंबर 2020 पर्यंत अदर सर्विस प्रोवाइडर्स OSP साठी वर्क फ्रॉम होमची सुविधा आणखी चांगली होण्यासाठी नियम-कायद्यात सूट दिली आहे.'
मार्चमध्ये दूरसंचार विभागाने अदर सर्विस प्रोवाइडर्स OSP साठी नियम-कायद्यात 30 एप्रिलपर्यंत सूट दिली होती. वर्क फ्रॉम होमची सूट त्यानंतर 31 जुलैपर्यंत वाढवली होती. आतापरत 31 डिसेंबर पर्यंत ही सूट देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 25 मार्चपासून लॉकडाउनची घोषणा केली होती. तेव्हापासून आतपर्यंत आयटी इंडस्ट्रीचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण पाहता टाटा कंसल्टेंसी सर्विसेस (TCS), एचसीएल टेक्नोलॉजीज, विप्रो आणि इन्फोसिस सारख्या भारतीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची सुविधा दिली होती.
आयटी इंडस्ट्रीने सरकारकडे मागणी केली होती की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्थायी रूपात घरुनच काम करण्याची परवानगी देण्यात यावी. ज्यामुळे कंपन्यांना त्यांची संसाधने आणखी चांगल्या प्रकारे वापरता येतील. सोबतच रिमोट वर्किंग आणि ऑफिसच्या कामासाठी कंपन्यांना एक वेगळं मॉडेल हवं आहे.