वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १६ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ लाख ४५ हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी जवळपास साडे चार लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या १५ हजारांहून अधिक झाली आहे. युरोप, अमेरिकेत कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील १५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे.
BreakingNews । जगभरात कोरोनाचा फैलाव सुरुच । आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू तर आतापर्यंत १६ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण । ३ लाख ४५ हजार लोकांची कोरोनावर मात#coronavirusinindia #COVID2019 #Coronavirus #CoronaInMaharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/kLIvL40kYj
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 10, 2020
अमेरिकेत कोरोनाचे मोठा प्रादुर्भाव होत आहे. आतापर्य़ंत चार लाख ४९ हजार जणांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा १५ हजारांवर पोहोचला आहे. तर स्पेनमध्ये १५ हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये दीड लाखांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल इटलीत मृतांची संख्या १८ हजारांवर पोहोचली आहे. इटलीत एक लाख ४३ हजारजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
भारत देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ६ हजार ७२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तर महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १ हजार ३७५ वर पोहोचलाय. तर मृतांची संख्या थेट ९७ वर पोहोचलीय. गुरुवारी दिवसभरात राज्यात २२९ कोरोना रुग्ण वाढले आणि २५ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत दिवसभरात १६२ रुग्ण वाढले असून, कोरोना रुग्णांची संख्या ८७६ वर पोहोचलीय. मुंबईतील मृतांची संख्या ५४ वर पोहोचलीय.