World Elephant Day 2021: संपूर्ण जगभरात 12 ऑगस्ट हा दिवस (World Elephant Day 2021) जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगातील हत्तींच्या संरक्षणार्थ समर्पित आहे. हत्ती हा प्राणी भारतात अनन्यसाधर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये येतो. इथं हत्तीला गजराज म्हणून त्याची पूजाही केली जाते. साक्षात गणपती म्हणून या गजरापुढं सारेच मान झुकवतात. अशा या प्राण्याबाबतच्या काही रंजक गोष्टी तुम्हाला माहितीतीयेत?
जन्मानंतर 20 मिनिटांत स्वत:च्या पायांवर उभं राहतं हत्तीचं पिल्लू
हत्तीचं पिल्ली जन्मानंतर अवघ्या 20 मिनिटांतच स्वत:च्या पायांवर उभं राहतं, तर तासाभरात चालू लागतं. २ दिवसांनी हे पिल्लू इतर हत्तींसोबत वावरु लागतं. हत्ती एकमेकांशी शरीर हलवून, एकमेकांना स्पर्श करुन, शरीराचा वास घेऊन संवाद साधतात. अनेकदा जिमिनीवर तरंग निर्माण करुनही ते संवाद साधतात.
दिवसभरात 150 किलो अन्नाची गरज
हत्तीला दिवसभरात 150 किलो अन्न, 80 लीटर पाण्याची गरज असते.
हत्ती झोपतात कसे?
झोपून (जमिनीव शरीर टेकवून) किंवा उभं राहून हत्ती झोपतात. तज्ज्ञांच्या मते जंगलांमध्ये हत्ती उभ्याउभ्याच झोपतात. जंगलामध्ये असणारा धोका पाहता अनेकदा रात्रीच्या वेळेस हत्ती उभ्यानेच झोपतात.
स्मरणशक्तीच्या बाबतीत हत्ती अव्वल
हत्तींचा टेम्पोरल लोब म्हणजेच मेंदूशी जोडलेला एक भाग हा मानवापेक्षाही मोठा असतो.ज्यामुळं ते आपल्यासोबत झालेली कोणतीही घटना विसरत नाहीत.