America Apollo-11 Mission: अमेरिकेने (America) 1969 मध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात (Astronaut) पाठवल होतं. मिशन अपोलो-11 अंतर्गत (Apollo-11 Mission) या तीनही अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल टाकलं (Moonwalk). या तीन अंतराळवीरांपैकी एक होते बज एल्ड्रीन (Buzz Aldrin). बज एल्ड्रीन यांच्या नावाची आणि कर्तृत्वाची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. आता बज एल्ड्रीन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी निमित्त आहे त्यांच्या लग्नाचं. वयाच्या 93 व्या वर्षी बज एल्ड्रीन यांनी आपली गर्लफ्रेंड डॉ. एन्का फॉरबरोबर (Anca Faur) लग्नगाठ बांधली. या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाले आहेत. बजन एल्ड्रीन आणि डॉ. एन्का फॉर यांनी कॅलिफॉर्नियाच्या (California) लॉस एंजिलिसमध्ये एका सोहळ्यात लग्न केलं.
93 व्या वर्षी लग्न
अंतराळवीर बज एल्ड्रीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. 93 व्या वाढदिवशी ही गोड बातमी देताना मला आनंद होतो, गर्ल फ्रेंड डॉ. एन्का फॉर हिच्याबरोबर लग्न गाठ बांधली, असं बज एल्ड्रीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बज एल्ड्रीन यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला 22 हजारहून अधिक लाईक मिळाले, तब्बल 1.8 मिलिअन लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जणांनी बज यांना वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 93 व्या वर्षी नवं आयुष्य सुरुवात करणाऱ्या बज यांचं अनेकांनी कौतुकही केलं आहे.
On my 93rd birthday & the day I will also be honored by Living Legends of Aviation I am pleased to announce that my longtime love Dr. Anca Faur & I have tied the knot.We were joined in holy matrimony in a small private ceremony in Los Angeles & are as excited as eloping teenagers pic.twitter.com/VwMP4W30Tn
— Dr. Buzz Aldrin (@TheRealBuzz) January 21, 2023
बज यांचं तीनवेळा लग्न
बजन एल्ड्रिन यांचं तीन वेळा लग्न आणि घटस्फोट झाला आहे. मिशन अपोलो-11 मधल्या तीन अंतराळवीरांपैकी बज एल्ड्रिन हे एकमेव जिवीत अंतराळवीर आहेत. नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर होते, त्यांच्या 19 मिनिटांनी बज एल्ड्रीन यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं.
बज एल्ड्रिन 1971 साली निवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. अंतराळवीर बनू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन देण्याचं काम ही कंपनी करते.